राष्ट्रसंतां च्या भजन खंडातील हे गंगा मातेच् महत्व दर्शविणार एक सर्वांना परिचित मराठी भजन आहे भारतीय धर्मग्रंथात संत साहित्यात गंगामातेच महिमान तेच उल्लेख वर्णन आवर्जून संतांनी केलेला आहे गंगा नदीच्या अवतरण याविषयी वेगवेगळ्या अख्यायिका आहेत सर्वांना प्रचलित सर्व सर्वश्रुत राजा भगीरथाने त्याच्याअथक प्रयत्न ने या पृथ्वीवर गंगा अवतरली असे मानले जाते
सूर्यवंशी राजा सगर याने अश्वमेध यज्ञ केला होता हा यज्ञ यशस्वी झाला तर आपले राज्य जाणार असे इंद्रदेवाला वाटू लागले भयभीत झालेल्या इंद्राने यज्ञासाठी वापरण्यात येणारा अश्व घोडा चोरून पाताळा मध्ये कपिल मुनींच्या आश्रमात लपवून ठेवला सगर राजाने आपल्या 60000 मुलांना अश्वाच्या शोधात पाठविले ते अश्वाच्या शोधासाठी फिरत फिरत शेवटी कपिल मुनींच्या आश्रमात आले तेथे अश्व बांधलेला पाहून त्यांनी कपिल मुनिना चोर समजून त्यांच्याशी अभद्र वर्तणूक केली त्यांचा परिणाम असा झाला की सगर राजाचे सगळे 60000 पुत्र ऋषीच्या शाप कोपग्निने तात्काळ भस्म झाले सगर राजाला ही बातमी जेव्हा कळली तेव्हा त्याने आपला पौत्रअंशुमन याला त्याची क्षमा मागायला आणि त्यावर उपाय विचारायला पाठविले
यावर कपिल मुनी म्हणाले यांचा उद्धार पतित पाणिनि पापनाशिनी गंगा नदीच्या जल स्पर्शाने प्राशन केल्याने होऊ शकेल नंतर सगर राजाने अथक प्रयत्न केला पण गंगा प्राप्त होऊ शकली नाही त्यानंतर अंशुमन त्याचा पुत्र दिलीप यांचेही प्रयत्न विफल गेले.
यानंतर दिलीप पुत्र भगीरथाने गोकर्णी तिर्थी जाऊन अंगठ्याच्या अग्र भागावर उभे राहून घोर तपस्या केली ब्रह्मदेवाच्या प्रसन्नत अंती ते म्हणाले मी गंगेला पृथ्वीवर पाठवतो पण तिच्या प्रवाहाच्या वेगाला रोखण्याची शक्ती पृथ्वीमध्ये नाही याकरिता भगवान शंकर जोपर्यंत कृपा करत नाही तोपर्यंत कार्य सिद्ध होणार नाही तब वत्स तुमको उनकी आराधना करणी पडेगी
तेव्हा पुन्हा भगीरथाने अन्न जलाचा परित्याग करून भगवान शंकराची आराधना केली तेव्हा भगवान शंकराने आपल्या जटे मध्ये गंगेला धारण केले आणि तेव्हापासून हळूहळू प्रवास भगिरथा चा सुरू झाला भगीरथ भगीरथ राजाचा सुंदर रथ पुढे पुढे आणि सौंदर्यवती मनोहारी गंगा आपल्या डौलाने त्याच्या मागे मागे जाऊन लागली.
राष्ट्रसंतांनी आपल्या भजनात सुद्धा हा उल्लेख केलेला आहे
गंगे गंगे ए ए तव चरण शरण मैं आऊ !! ध्रु!!
परवत फाडे कळ कळ मोडे राजा भगीरथ कस के जोडे हरी का द्वार समा कर छोडे कैसे यह बीसराऊ /3/
गुरु कुंज में जलकुंड बनवाया सर्वतीर्थ यह मान बनवाया ऊस मे भी तू शामिल है ही बैठे बैठे गुण गाऊ/4/
शोभे जटेत गंगा राही पिऊनी भंगा मस्त बैलवाला जीव पाहण्या भुकेला त्या प्रिय शंकराला जीव पाहण्या भुकेला/3/
भगीरथाने आपल्या अथक प्रयत्नाने गंगेला नेत असतानाचे दृश्य प्रेक्षणीय होते अनेक गंधर्व यक्ष देवर्षी या अद्भुत दृश्याला पाहून मुग्ध झाले वनातील पक्षी जनावरे आनंदून गेले मार्गातील सर्व स्थानांना पवित्र करीत सगर पुत्राच्या राख भस्म ला आपल वित करीत वाहू लागली तेव्हापासून ज्या कार्यात अथक प्रयत्न करावे लागतात त्या प्रयत्नांना भगरीथी प्रयत्न अशी उपमा दिली जाते.
महाकवी कालिदास म्हणतात
पापहरी दूरीतारी तरंग धारी
शैल प्रचारी गिरीराज गुहा विदारी झंकार कारी हरिपाद जोप्रहरी गांग पूनातु सतत शुभकारी वारी
महर्षी वेदव्यास यांनी महाभारतात गंगेचा महिमा असा वर्तविला आहे
सर्व शास्त्र मही गीता सर्व देव मयो हरी: सर्व तीर्थमयी गंगा सर्व वेद मयो मनु :
सर्व तीर्थामध्ये सर्वाधिक महिमा गंगा नदीचा आहे त्यात आंघोळ केल्याने पापांचा नाश होतो परंतु गंगा स्नान करणे प्रत्येकालाच शक्य नसते
राष्ट्रसंत यावर ग्रामगीतेत सांगतात
जन्मभरी सूत विनोन प्रगट देखीला जनी जनार्दन त्या भक्त कबीराचे महिमान गंगेतील पाशान कैसे जानती 88/22
आपण आजपर्यंत किती पाप पुण्य केले आपले कर्तृत्व त्या गंगेतील दगडाला काय माहित जन्मभर प्रामाणिकपणाने सूत विनोन जनतेत ईश्वराचे दर्शन घेणाऱ्या कबीराचे महिमान गंगेतील दगडाला काय माहिती आपले कार्य आपले कर्म सोबत येतात आयुष्यभर पाप करायचे आणि गंगेत डुबकी मारायची याने काय पाप धुतले जातील
अशी ही पापनाशिनी गंगा हिमालयाच्या उत्तर भागातून गंगोत्री मधून निघून ऋषिकेश हरिद्वार कानपुर प्रयाग वाराणसी पाटलिपुत्र भागल्पुर या स्थानांना पावन करीत गंगा सागराला जाऊन मिळते
सारे तीर्थ बार बार गंगासागर एक बार
आज वर्तमानात गंगा प्रदूषणावर खूप चर्चा होते आहे शासन या प्रदूषणासाठी चीनतीत आहे यापूर्वी ऋषीमुनींनी पूर्वीपासूनच जागृत केले होते नदीचे पवित्र कायम राहण्यासाठी काही नियम संतांनी त्याच वेळेस घालून दिले होते त्या नियमांची सर्रास पायमल्ली होते
मृत्यूशय्येवर पडलेल्या मनुष्याच्या मुखात गंगाजल टाकायची रीत होती आणि आजही आहे
मनोहर गंगाजल स्वादिष्ट पाक युक्त द्वीदोष शीतल स्वरूप आहे अशीही गंगामाता ब्रम्हा रुपीने विष्णू रूपिणी तथा रुद्र रुपिनी तिला माझा कोटी कोटी प्रणाम
गंगे च यमुने च ओम नमो गंगे विश्वरूपी नारायणा नमो नम
सर्वांना जय गुरु जय जय राम कृष्ण हरी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
श्री हेमंत तात्याजी मेश्राम जांभुळ घाट ( नागपूर) राष्ट्रसंतांचा एक सेवक
मो 8080379107
दी 6/6/2022
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आपल्या प्रतिक्रिया द्या....