"प्रवास करतांना वाहन चालकांनी : सकाळी मॉर्निग वॉकला जाणाऱ्या क्रिडापटू यांनी सावधान राहण्याची गरज."
कारंजा (लाड) : अवकाळी पाऊस आणि हवामानाचा पारा प्रचंड वेगाने खाली उतरल्यामुळे, वातावरणात कमालीचा गारठा निर्माण होऊन गावोगावी, शेताशिवारात,गावात, जंगलात,दाट धुक्याची चादर निर्माण होत आहे. धुक्याच्या या दाट चादरीमुळे,रस्त्यावरून पाच ते दहा फुटाच्या अंतरावरून वेगाने धावणारे क्रिडापटू, प्रवासी वाहने,मोटर सायकल इत्यादी कोणतीच वाहने अगदी जवळ आल्याशिवाय एकमेकांना दिसतच नाहीत. त्यामुळे अशावेळी कोणताही अपघात होणार नाही याची काळजी घेऊन, स्वतःच्या कुटुंबियाचा आणि सभोवतालच्या वातावरणाचा विचार करून कमीतकमी वेगाने आपली वाहने चालवावीत व स्वतःचे आणि इतरांचे जीवन वाचवावे असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी केले आहे.