तीर्थक्षेत्रे : भारतातील जम्मू आणि काश्मिर येथील वैष्णोदेवी मंदिर, अमरनाथ गुहा, पंजाबचे सुवर्ण मंदिर, दिल्लीतील अक्षरधाम, दिगंबर जैन लाल मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, उत्तराखंडचे गंगोत्री, केदारनाथ नीलकंठ महादेव, यमुनोत्री मंदिर, झारखंडचे बैद्यनाथ धाम, उत्तर प्रदेशातील काशी विश्वनाथ, इस्कॉन व अयोघ्याचे श्रीराम मंदिर यासोबतच ओरिसा, बिहार, आसाम, राजस्थान गुजरात, मध्य प्रदेश कर्नाटक, आंध्र प्रदेश तामिळनाडू, केरळ या राज्यांमधील एकूण 73 तिर्थस्थळे आणि महाराष्ट्रतील मुंबईचे सिद्धिविनायक मंदिर, चैत्यभूमी दादर, मुंबादेवी मंदिर, सेंट जॉन द बॅप्टीस्ट चर्च, माउंट मेरी चर्च, पुण्याचे चिंतामणी, महागणपती, जेजुरीचे खंडोबा, संत ज्ञानेश्वर समाधी आळंदी, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, जैन मंदिर, माहुरचे रेणुकादेवी, नाशिकचे मुक्तीधाम, काळाराम, संप्तशृंगी, परळीचे वैजनाथ, नागपूरची दीक्षाभूमी, यवतमाळचे चिंमामणी असे राज्यातील विविध 66 तिर्थस्थळांचा या योजनेत समावेश आहे.