"एक देश मे दो विधान,दो प्रधान, दो निशान नही चलेंगे"असा नारा देणारे डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंती निमित्त भाजपा कार्यालयात अभिवादान प्रसंगी प्रा प्रकाश बगमारे राज्य कार्यकारिणी सदस्य भाजपा ओबीसी मोर्चा यांनी भावपूर्ण भावना व्यक्त केल्या. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी हे भारतीय जनसंघाचे संस्थापक होते.कश्मीर पासून कन्याकुमारी पर्यन्त भारत एक देश आहे आणि कश्मीर हा देशाचा अविभाज्य घटक आहे. एक देश मे दो विधान, दो प्रधान, दो निशान नही चलेंगे असा नारा त्यांनी बुलंद केला व एकसंघ भारतासाठी त्यांनी लढा दिला. अनेक ठिकाणी त्यांच्या जयंतीनिमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. ब्रम्हपुरी भाजप कार्यालयात या प्रसंगी ब्रम्हपुरी भाजपा विधानसभा विस्तारक प्रा कादर शेख, माजी नगरसेवक तथा भाजपा नगर महामंत्री मनोज भूपाल,नगर कोषाध्यक्ष बाळू नंदूरकर, भाजपा ओबीसी मोर्चा शहर अध्यक्ष प्रा डॉ अशोक सालोडकर,साकेत भाणारकर,भाजयुमो जिल्हा सचिव तनय देशकर,नगर भाजयुमो महामंत्री रितेश दशमवार ,प्रा दिवाकर पिलारे,राजू भागवत निवृत्त भाग शिक्षणाधिकारी,सुरेश बनपूरकर व अन्य उपस्थित होते