वाशिम : राज्याच्या हवामान खात्याने दिलेले यंदाचे अंदाज खरे ठरवीत वळवाचा अवकाळी पाऊस कोकण किनारपट्टी,मुंबई सह पश्चिम महाराष्ट्र,मराठवाडा, पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भात चांगलाच बरसत असून,पूर्व विदर्भासह पश्चिम विदर्भातही अनेक ठिकाणी वादळी वारे, गारपिटीसह,आकाशातून विजाही कोसळत असल्याचे वृत्त आहे.त्यामुळे पावसाळासदृश पावसाने अनेक ठिकाणी फुलबागा,फळबागा, पालेभाज्याचे अतोनात नुकसान झाले आहे.येत्या आठवड्यातही महाराष्ट्राच्या मुंबई,कोकणपट्टी सह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार वादळी पाऊस बरसरणार असून, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेत मालाची काळजी घ्यावी. शेतात राहणारे शेतकरी,गुराखी,मेंढपाळ यांनी स्वतःची व गुराढोरांची विशेष काळजी घ्यावी.दुपारनंतर शेतात न थांबता गावाकडे आपआपल्या घरी परतावे. आज बुधवार दि.२१ मे रोजी वाशिम,रिसोड, मालेगाव,मंगरूळपिर,मानोरा व कारंजा शहरातील काही भागात आणि ग्रामिण क्षेत्रात धो धो पाऊस झाला आहे. या पावसामुळे आंबा, लिंबू, फळबागा, फुलबागा, पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. . . . दुसरी आनंदाची वार्ता म्हणजे केरळमध्ये नेहमीपेक्षा आधीच मान्सून दाखल झाला असून,त्याची पुढील वाटचाल अशीच वेगाने झाल्यास आठ ते दहा दिवसात मान्सून महाराष्ट्रभर दाखल होऊन विदर्भातही मान्सूनचा मोसमी पाऊस लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे.त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी आठ ते दहा दिवसातच शेतीच्या मशागतीची (पूर्व पेरणीची) कामे आटोपून घ्यावी.रोहिणी नक्षत्र, रविवारी दि.२५ मे २०२५ रोजी लागणार असून यंदा संपूर्ण रोहिणी नक्षत्रात रिमझिम ते चांगला पाऊस बरसण्याची चिन्हे आहेत.तसेच पुढील महिन्यात, रविवारी दि.०८ जून २०२५ रोजी मृग नक्षत्र सुरू होणार आहे. त्यामुळे मान्सूनचा मोसमी पाऊसही विदर्भात पंधरा दिवसाचे आतच पोहचण्याची चिन्हे दिसत आहेत. लवकरच मान्सून पाऊस सुरु होणार असल्याने शेतकरी सुखावला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची पेरणी पूर्व तयारी जमिनीची मशागत करून ठेवावी.मात्र चांगला भरपूर पाऊस झाल्या शिवाय पेरणी करू नये.तसेच येत्या आठवड्यात होणाऱ्या वादळी पावसाच्या अंदाजाने सतर्क होऊन सावधगीरी बाळगावी असे आवाहन करण्यात येत असल्याचे ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी कळवीले आहे.