वाशिम : दि.११ मे २०२५ रविवार रोजी शेगाव येथील अग्रेसन भवन येथे सकाळी १०:०० ते दुपारी ५:०० वाजेपर्यंत तेली समाजाचे प्रथम राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले तरी जास्तीत जास्त संख्येने तेली समाज बांधवांनी या अधिवेशनास उपस्थित राहावे असे आवाहन श्री.संताजी नवयुग मंडळ,महाराष्ट्रचे अध्यक्ष सुभाष घाटे यांनी केली आहे.
श्री.संताजी जगनाडे महाराज म्हणजे तेली समाजाचे आराध्य दैवत असून, संत तुकाराम महाराज यांचे ते परम शिष्य होते.संत तुकाराम महाराज यांच्या गाथेचे पुन्हा लिखाण करून त्या जिवंत ठेवण्याचे काम श्री.संताजी महाराज यांनी केले.अशा श्री.संत जगनाडे महाराज यांच्या आशीर्वादाने शेगाव नगरी येथे तेली समाजाचे प्रथम राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले.या अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून आमदार कृष्णाजी खोपडे, पूर्व नागपूर,कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.जयदत्तजी क्षीरसागर राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महाराष्ट्र राज्य,तसेच विशेष उपस्थिती म्हणून मा.तोखणजी साहू केंद्रीय राज्यमंत्री,मा.ना.अरुणजी साव उपमुख्यमंत्री छत्तीसगड, प्रमुख पाहुणे म्हणून मा.मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य,माजी खासदार संगमलालजी गुप्ता राष्ट्रीय महामंत्री भाजपा,मा.भरतजी साह आमदार नेपाळ,मा. खासदार प्रमोदजी साह, तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून मा.विजयजी वडेट्टिवार आ.ब्रह्मपुरी,संदिपजी क्षीरसागर आमदार बीड, मा.बाळासाहेबजी मांगूळकर आमदार यवतमाळ,मा.सुरेशजी वाघमारे माजी खासदार,मा.अरूणजी भस्मे
राष्ट्रीय अप्पर महामंत्री, मा.मुकेशकुमार नंदन राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष, मा.आभाताई साहु राष्ट्रीय महिला अध्यक्ष,मा. शिवदासजी सेठ उबाळे अध्यक्ष जगनाडे तेली संस्था सुदुंबरे,मा.ईश्वरजी बाळबुधे महासचिव समता परिषद,मा.राजुभाऊ झापर्डे माजी अध्यक्ष तेली समाज खामगांव,मा.आशिष वांदिले
समाजसेवक नागपूर,मा.रजनीशजी गुप्ता समाजसेवक,दिल्ली,मा.राजीव कारेमोरे आमदार तुमसर,मा.राजेशजी बकाने
आमदार देवळी,मा.संदिपजी साहु आमदार छत्तीसगढ,मा.कैलासजी साहु माजी आमदार उ.प्र,मा.उमेशजी साहु राष्ट्रीय अध्यक्ष, मा.सुधाकरजी झापर्डे समाजसेवक अकोला,संगीता ताई चौधरी समाजसेविका गुजरात,मा.विजयजी चौधरी अध्यक्ष प्रदेश तेली महासंघ,मा.प्रमोदजी देंडवे अध्यक्ष संताजी सेना,मा.पांडुरंगजी मेहर अध्यक्ष भवानी चॅरीटेबल ट्रेस्ट नागपूर,मा.रविंद्र येनुरकर समाजसेवक नागपूर,मा.संजयजी साह समाजसेवक,नेपाळशरदजी तेली समाजसेवक बदलापूर,मा.कैलाशजी चौधरी
समाजसेवक मा.अशोकजी पांगरकर समाजसेवक जालना,मा.विनायकराव गुल्हाणे समाजसेवक मुर्तीजापूर,मा.गजाननजी भजभुजे अध्यक्ष एरंडेल तेली समाज, मा.सत्यनारायणजी साह अध्यक्ष साहू तेली समाज नेपाल,मा.सुभाषजी देव्हळे समाजसेवक चिखली,मा.श्रीमती नंदाताई पाउलझगडे समाजसेविका मा.नरेंद्रजी तराळे समाजसेवक वणी-वरोरा,रविंद्रजी चौधरी समाजसेवक,राजुजी गुल्हाणे समाजसेवक, मानोरा,योगेशजी गोतमारे समाजसेवक आकोट,मा.अमोलजी पाटणकर विशेष कार्य अधिकारी,डॉ.संजयजी दुधे माजी प्र-कुलगुरू,किरण रामभाऊजी क्षार समस्त तेली समाज अध्यक्ष कारंजा,श्रीमती.सुषमाताई राऊत समाजसेविका,पत्रकार हे सर्व उपस्थित राहणार आहेत.असे वृत्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष संजय कडोळे यांना कळविण्यात आले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....