वाशीम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालय व सर्व जि. प. प्राथमिक शाळा येथे मराठा व कुणबी समाजातील वंचित घटकापर्यंत "सारथी" चे विविध प्रशिक्षण,उपक्रमांची माहिती भावना कम्प्युटर एज्युकेशन वाशिम तर्फे पोहचवून लाभ घ्यावा असे आवाहन भावना कम्प्युटर एज्युकेशनचे संचालक मो. शोएब निझामी सर यानी केले आहे.
या कार्यक्रमाला गावातील व ग्रा. प. सदस्य गण, पोलीस पाटील, ग्रामसेवक, शाळा मुख्यद्यापक आदी मान्यवर उपस्थित होते
छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था पुणे मोफत अर्थात "सारथी" आणि महाराष्ट्र नॉलेज पीएचडी,कॉर्पोरेशन लिमिटेड एमकेसीएल यांच्या संयुक्त विद्यमानाने सीएसएमएस डीप २० हजाराचा डिप्लोमा कोर्स अगदी मोफत देत आहे.
या क्षेत्रात मराठा व कुणबी समाजातील विद्यार्थ्याचा जास्तीत जास्त सहभाग वाढावा यासाठी हि संस्था कार्य करते. यावर्षी या संस्थेने प्रथमच संगणक क्षेत्रात पाऊल टाकल आहे. याची माहिती गावातील प्रत्येक घटका पर्यंत पोहोचवण्यासाठी १५ ऑगस्टचे औचित्य साधून ग्रामस्थांना, विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षकांना सारथींच्या विविध योजना, जसे की परदेशी भाषा प्रशिक्षण, दुर्बल घटकांसाठी जनजागृती शिष्यवृत्ती, कृषी विभागाच्या योजना, उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना, या अशा अनेक उपक्रमांची माहिती कॉम्पुटरचे संचालक मो. शोएब निझामी सर यांच्या मार्गदर्शरखाली सारथी चे विद्यार्थी शंकर ठोंबरे व कु मेघा वारकड या विद्यार्थ्याने माहिती व महत्त्व पटवून दिले. याप्रसंगी शिक्षक, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य केले.सारथी संस्थेमार्फत आयोजित कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वाशीम येथील भावना कम्प्युटर एज्युकेशन या अधिकृत केंद्रावर मोफत संगणक व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. १८ ते ४५ वयोगटातील उमेदवारांकरिता महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत तालुकास्तरापर्यंत सारथी संस्थेमार्फत निःशुल्क व्यक्तिमत्त्व व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण घेण्यासाठी लक्षित गटातील पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील एमकेसीएलच्या निवडक अधिकृत केंद्रावर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षण घेण्यासाठी आवश्यक संपूर्ण माहिती व ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थिनी एमकेसीएलच्या अधिकृत केंद्रावर भेट द्यावी, असे आवाहन संचालक मो. शोएब निझामी सर यानी केले आहे