आज दि.05 ऑक्टोबर 2023 रोजी वनपरिक्षेत्र आरमोरी यांच्यावतीने दि .01 ऑक्टोंबर ते 07 ऑक्टोंबर "वन्यजीव सप्ताह" निमित्ताने हितकारणी महाविद्यालय ,आरमोरी येथील विद्यार्थ्यांची हितकारीणी महाविद्यालय आरमोरी ते वघाळा ( जुना ) पर्यंत सायकल रॅली काढून वन्यजीवांविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच मौजा वघाळा (जुना )येथील पक्षी संरक्षण व संवर्धन समितीला भेट देऊन विविध स्थलांतरित पक्षांबद्दल माहिती देण्यात आली .
या कार्यक्रमाला श्री मा.जे एस फुलझेले ,प्राचार्य हितकारीणी महाविद्यालय, आरमोरी श्री.एस डब्ल्यू प्रधान सर,श्री आर .ई.दोनारकर सर , कु. सारवे मॅडम, कु.मेश्राम मॅडम, श्री रामदासजी दोनारकर माजी अध्यक्ष, पक्षी संरक्षण व संवर्धन समिती वघाळा ,श्री चिदानंद प्रधान ,अध्यक्ष पक्षी संरक्षण व संवर्धन समिती , वघाळा , श्री आर.पी. कुंभारे क्षेत्र सहाय्यक आरमोरी, श्री.अजय उरकुडे वनरक्षक रवी, श्री.पी आर पाटील ,वनरक्षक आरमोरी श्री.आनंद साखरे, वनरक्षक रामाळा ,कु.नलीनी भर्रे मॅडम, इंजेवारी व वनमजूर व शालेय विद्यार्थ्यी उपस्थित होते. सदर कार्यक्रम मा.श्री.पवनकुमार जोंग (भावसे )परिविक्षाधीन वनपरिक्षेत्र अधिकारी, आरमोरी मा.श्री. अविनाश मेश्राम , वनपरिक्षेत्र अधिकारी आरमोरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या कार्यक्रमाला श्री. रामदासजी दोनारकर माजी अध्यक्ष, पक्षी संरक्षण व संवर्धन समिती वघाळा , श्री.आर पी कुंभारे क्षेत्र सहा.आरमोरी व श्री.आनंद साखरे वनरक्षक रामाळा यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना पक्षांबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.पी आर पाटील वनरक्षक आरमोरी यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.अजय उरकुडे वनरक्षक रवी यांनी केले.