गडचिरोली:—सन १९७२ या वर्षी स्थापित दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था,गडचिरोली या वर्षी ५० व्या वर्षात पदार्पण करीत आहे. (सन १९७२ ते २०२२). या सुवर्ण महोत्सव वर्षात संस्थेतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. या घटक संस्थेतील प्रज्ञा संस्कार कॉन्हेंटच्या सभागृहात शनिवारी कॅन्सरबद्दल " जागरूकता, उपाय व दक्षता " कार्यशाळेचे आयोजन "आक्टोबर सर्व्हिस वीक अंतर्गत प्रज्ञा संस्कार काॅन्व्हेंट व लाॅयन्स क्लब गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने पालक व शिक्षक यांच्याकरिता आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला स्टाॅप कॅन्सर मिशन च्या समुपदेशक लता हरसुले व सहकारी रवी आवळे यांचे मागदर्शन लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लॉ. शांतीलाल सेता यांनी केले.
कॅन्सरचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी समुपदेशक लता हरसुले यांनी आपल्या ओघवत्या वाणीने मार्गदर्शन केले. यात लहान मुलांपासून ते सर्वच वयोगटातील स्री पुरूषांना चोरपावलाने होणार्या कॅन्सर चे प्रकार पण मूळातच हा आजार होऊ नये म्हणून कोणती सावधगिरी बाळगायची याविषयी अतिशय सखोल अशी माहिती देतानाच कॅन्सरची लक्षणे कशी ओळखायची आणि त्वरीत उपचार घेतल्यास या रोगापासून मुक्त होऊ शकतो, याबद्दल सविस्तर असे विवेचन केले.
कार्यक्रमाचे संचालन अदिती उप्परवार
यांनी केले. कार्यक्रमाला लॉ.बाळासाहेब पद्मावार, लॉ. नादिरभाई भामानी, लॉ. चिलमवार, लॉ. कामडी, लॉ. पुरुषोत्तम वंजारी, लॉ. डाॅ.सुरेश लड़के,लॉ,नितिन चेंबुलवार, लॉ. सविता कामडी , लॉ. निलीमा देशमुख , प्रज्ञा संस्कार कॉन्व्हेंटचे प्राचार्य चेतन गोरे, उपप्राचार्या जयश्री मुळे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यशाळेला शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचार्यांसह पालकवर्ग मोठ्या संख्येंने उपस्थित होते.