जिल्ह्यातील हवामान अभ्यासक गोपाल गावंडेचे अंदाज अचूक. : युवाक्रांती समाचारद्वारे संजय कडोळे यांनी केले होते आधीच सतर्क.
वाशीम/अकोला* : जिल्ह्यात सद्यस्थितीत सुरू असलेल्या सततधार पावसामुळे आता ढगफुटीसदृश्य अतिमुसळधार पाऊस सुरू असल्याने नदी,नाले, धरण,पाझर तलाव,आदी जलाशय तुडूंब भरून वहात असल्याने एकीकडे वाशीम-अकोला जिल्ह्यातील, पुढील वर्षीच्या,पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे.तर दुसरीकडे अतिपावसाने वाशिम जिल्ह्यातील रिसोड मालेगाव,शेलू बाजार अकोला जिल्ह्यातील तेल्हारा,मुर्तिजापूर,दर्यापूर रोडवरील खेडेगावे इत्यादी ठिकाणी झालेल्या ढगफुटीने, येथील शेत जमिनी पिकांसह खरडून गेल्या असून शेतकऱ्यावर आसमानी संकट कोसळले आहे. अतिपावसाने शहरातील रस्त्यांवर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.पावसामुळे बांधकाम कारागीर,शेतमजूर,बागवान, चाकरमाने यांचा रोजगार हिरावल्या गेला असून डाबरीतील शेतकऱ्याच्या शेतात पाणीच पाणी साचत असल्याने, शेतपिके,भाजीपाला व फळबागांचे अतोनात नुकसान असून,शासनाकडून अविलंब पंचनामे करून,शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी पुढे आली आहे. व आजच्या परिस्थितीत जगाच्या पोशिंद्याला आधार देणे अत्यावश्यक आहे.तसेच शेतमजूर,बांधकाम कारागीर मजूर,रोजंदारी चाकरमाने यांच्यासाठी शासनाने स्वस्त धान्य दुकानातून धान्य,शिधा व जिवनावश्यक किराणा पुरविण्याची मागणी रिसोड,मालेगाव,शेलूबाजार परिसरातील सर्वच खेड्यापाड्यांतील ग्रामीण शेतकरी ग्रामस्थाकडून होत आहे.ऑगस्ट महिन्यात अशाप्रकारचा अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज जिल्ह्यातील एकमेव हवामान अभ्यासक गोपाल विश्वनाथ गावंडे यांनी दि.३१ जुलै २०२५ रोजी सांगीतला होता.तर दुसरीकडे जिल्ह्यातील महाराष्ट्र शासनाद्वारे सन्मानप्राप्त ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी दैनिक विश्वजगत,साप्ताहिक करंजमहात्म्य व जिल्ह्यातील इतर वृत्तपत्राव्दारे वेळोवेळी बातम्या प्रसिद्ध करून शेतकरी-ग्रामस्थांना सतर्कतेचा स्पष्ट इशारा दिलेला होता.सध्या हवामान अभ्यासक गोपाल गावंडे यांनी दिलेल्या अंदाजाप्रमाणे पाऊसधारा कोसळत आहेत.हा पाऊस कमी अधिक प्रमाणात दि.३० ऑगस्ट २०२५ पर्यंत होणार आहे. काही ठिकाणी भाग बदलवीत बारीक सारीक ते मुसळधार पाऊस होणार असून अनेक ठिकाणी सूर्यदर्शन दुर्लभ होऊ शकते. दरम्यान विदर्भाचे काही भागात सोसाट्याचा वारा, ढगांचे गडगडाट,विजांचे लखलखाट होऊन विजा पडण्याची शक्यता दिसून येत आहे. तरी शेतकरी, शेतमजूर,गुराखी,मेंढपाळ, ग्रामस्थ,प्रवाशी यांनी सावधगीरी बाळगावी.पुराचे पाण्यातून जाऊ नये,हिरव्या झाडावर विजा पडण्याची शक्यता असल्याने झाडाच्या आश्रयाने थांबू नये. विजा होत असतांना मोबाईल बंद करून ठेवावे.असे आवाहन जनतेला सावधान करतांना, अक्षरशः हात जोडून शेतकरी ग्रामस्थांना आपण करीत असल्याचे महाराष्ट्र शासन सन्मान प्राप्त ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी केले असून, तुम्ही काळजी करू नका.यंदा तुमच्या शेतमालाची पिकाची परिस्थिती चांगली राहून, सगळीकडे सुबत्ता नांदणार असून,शासनाकडूनही शेतमालाला चांगले भाव मिळण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....