संतोष धरमकर साप्ता विंग विदर्भ संघटक,पंजाबराव वर जिल्हाध्यक्ष तर नुरूद्दीन सिध्दीकी यांच्या नांदेड शहर अध्यक्षपदाची घोषणा !
अकोला - लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचा ३७ वा मासिक विचारमंथन मेळावा नुकताच संपन्न झाला स्थानिक जठारपेठेतील जैन रेस्ट्रोमध्ये डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सेवानिवृत्त विभागप्रमुख, साहित्यिक डॉ.प्रकाश देशमुख या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर महाराष्ट्र बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य अॕड संजय सेंगर,पर्यावरण मित्र,समाजसेवक विवेक पारसकर,हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.तर लोकस्वातंत्र्य संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष व ईलना राष्ट्रीय पदाधिकारी संजय एम.देशमुख व सैन्न्यातील सेवानिवृत्त तथा महागांव,जि.यवतमाळचे कर्तव्यदक्ष, संवेदनशील नायब तहसिलदार मोहन कोल्हे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.प्रकाश देशमुख लिखित " विलक्षण विभूती आणि मुलखावेगळी माणसं" या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. पुस्तक आणि लेखक परिचय सुरेश पाचकवडे यांनी करून दिला.यावेळी अध्यक्ष,अतिथी आणि प्रमुख उपस्थितांना सन्मानपत्र,शाल,आणि बुके देऊन तर एक शालेय विद्यार्थीनी वैष्णवी देशमुख हिची भेट वस्तू आणि सन्मानपत्र तिचे वडील संदिप व सौ.स्वाती देशमुख यांना देण्यात आले.
सर्वप्रथम लोकस्वातंत्र्यच्या सामाजिक सेवेचे अधिष्ठाण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगे बाबांना वंदन करून अभिवादन करण्यात आले.देशातील शहिद जवान,लैंगिग अत्त्याचारात बळी गेलेल्या भगिनी,आत्महत्त्याग्रस्त शेतकरी,नैसर्गिक आपत्ती आणि रस्ते अपघातातील बळींना याप्रसंगी श्रध्दांजली वाहण्यात आली. उपस्थित अतिथी यांनी मनोगतातून व डॉ.प्रकाश देशमुख यांनी अध्यक्षिय भाषणातून लोकस्वातंत्र्यच्या अविरत उपक्रमाचे, शिस्तबध्द,प्रामाणिक,नैतिक वाटचालीचे तथा पत्रकार आणि सामाजिक कल्याणाच्या संवेदनशील भूमिका आणि उपक्रमांचे कौतुक करून संघटनावाढीसाठी आत्मविश्वासवर्धक शुभेच्छा व्यक्त केल्या.अध्यक्ष संजय देशमुख यांनी संघटनेला प्राप्त यश, वाटचालीचा आढावा आणि भविष्यातील संकल्पसिध्दीच्या नियोजनबध्द कार्यक्रमाची माहिती दिली. लेखणीचे वारे या वत्तपत्राचे संपादक संतोष धरमकर यांची लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या साप्ताहिक वृतपत्र विंगच्या विदर्भ विभागीय संघटन तथा संपर्क प्रमुख पदावर तर अकोला येथील पत्रकार,कवी साप्ता.नारी ललकारचे संपादक पंजाबराव वर यांची साप्ताहिक वृत्तपत्र विंगच्या जिल्हाध्यक्षपदावर आणि हिन्दी पत्रकार,सिने कलाकार नुरूद्दीन सिध्दीकी यांची नांदेड शहर अध्यक्षपदावर निवड झाल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.त्यांच्या नेर्तृत्वातील त्यांचेसह संतोष धरमकर व साप्ता.विंगच्या बुडन गाडेकर,विजय देशमुख,संघपाल शिरसाट,संजय निकस पाटील,संतोष मोरे,फुलचंद मौर्य,अजय वानखडे, अॕड.एम.एस.इंगळे, अॕड.प्रजानंद उपर्वट,या पदाधिकाऱ्यांना आय कार्ड वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला उपाध्यक्ष प्रदिप खाडे,सचिव राजेन्द्र देशमुख,प्रा.डॉ.संतोष हुशे,सिध्देश्वर देशमुख,पुष्पराज गावंडे, प्रा.राजाभाऊ देशमुख,अंबादास तल्हार,के.व्ही.देशमुख, डॉ.शंकरराव सा़ंगळे,सुरेश पाचकवडे,विनय दांदळे, प्रा.मोहन काळे,प्रा.विजय काटे,जिल्हाध्यक्ष सागर लोडम,दिलीप नवले,सतिश देशमुख,निंबेकर,सौ.जया भारती, सौ.सोनल अग्रवाल, सौ.दिपाली बाहेकर,लोकस्वातंत्र्य सामाजिक सेवा संघ जिल्हाध्यक्ष संजय देशमुख, कंझारेकर, नुरूद्दीन सिध्दीकी,नांदेड,माणिकराव कांबळे,वसंतराव देशमुख, साप्ताहिक विंगचे पदाधिकारी,देवीदास घोरळ,विजयराव बाहकर,अतुल वोरा,सुरेश ठाकरे,शिवचरण डोंगरे, तुषार हांडे,अर्जून घुगे,शरद देशमुख,अनंतराव देशमुख,अॕड राजेश कराळे,अॕड.संकेत देशमुख,अशोक पंड्या,दिवाकर देशमुख,गजानन मुऱ्हे,के.एम.देशमुख,गजानन चव्हाण,सौ.पदमा देशमुख,जगन्नाथ गव्हाळे, डॉ.अशोक तायडे,आकाश हरणे,गौरव देशमुख,मनोहर पाथरकर,विक्रम तिवारी,आकाश दंदी,प.रा.कारंजकर,जयंत देशमुख,प्रकाश जंजाळ,संदिप ग.देशमुख,हारूण देशमुख,देवराव परघरमोर, व बहूसंख्य पत्रकार आणि सामाजिक स्नेही उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचलन सौ.जया भारती इंगोले यांनी तर आभारप्रदर्शन राजेन्द्र देशमुख यांनी केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....