बुलडाणा /वाशिम :-
अक्षयतृतियेच्या शुभ मुहूर्तावर होणाऱ्या भेंडवळच्या घट मांडणीचे सुपर भाकित अखेर आज सकाळी जाहीर करण्यात आलं. याबाबत महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेला मिळालेल्या माहिती वरून, जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी कळविले की, सध्या आपण विज्ञान युगात जगत असल्यामुळे अंधश्रध्देला कोठेच थारा नाही . मात्र श्रद्धा व विश्वास सुद्धा अतूट असतो आणि त्यामुळे लाखो शेतकरी आजही भेंडवळच्या भविष्यवाणीची प्रतिक्षा करीत असतात . व भेंडवळचे भाकित घोषीत होताच आपल्या जमीनीच्या प्रतवारीनुसार पिकाचे नियोजन करीत असतात . त्यामध्ये बरेच वेळा या भविष्यवाणीचे अंदाज योग्य ठरत असल्याचे शेतकऱ्यांचे अनुभव असल्याचे वाशिम जिल्ह्याचे संजय कडोळे यांनी सांगीतले आहे . त्यामुळे ३५० वर्षांची परंपरा असलेली आणि शेतकऱ्यांच्या विश्वास असलेली परंपरा "भेंडवळची घट मांडणी" ३ मे रोजी संध्याकाळी पार पडली आणि आज भाकीत जाहीर करण्यात आलं. बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळच्या भविष्यवाणीकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं होतं. भेंडवळच्या घट मांडणीत शेती, पाऊसमान, आरोग्य आणि राजकारणाविषयी वर्षभराचं भाकित केलं जातं. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसह बियाणे कंपन्यांचंही भेंडवळच्या भाकिताकडे लक्ष लागलं होतं. अखेर या घटमांडणीचं भाकीत जाहीर झालं आहे.
भेंडवळ घटमांडणीनुसार, यंदा जून महिन्यात चांगला पाऊस तर जुलै महिन्यात साधारण पाऊस असेल, तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस पडणार आहे. तर यंदाही बळीराजाला अवकाळीचा सामना करावा लागणार आहे. भेंडवळ घटमांडणीतून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार, अवकाळी पाऊस वर्षभर राहणार आहे. तर गेल्या दोन वर्ष सामना करत असलेल्या कोरोनाचा यंदा मात्र नायनाट होण्याची शक्यता आहे. कारण यंदा देशात रोगराई राहणार असा अंदाज भेंडवळच्या घटमांडणीतून वर्तवण्यात आला आहे.
काय आहे भेंडवळची भविष्यवाणी?
यंदा देशात वरुणराजाची कृपा असणार आहे. जून महिन्यात चांगला पाऊस तर जुलै महिन्यात साधारण पाऊस पडणार आहे
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस पडणार आहे.
अवकाळीची चिंता मात्र वर्षभर शेतकऱ्यांना सतावणार आहे.
पिकांबाबत काय आहे भेंडवळची भविष्यवाणी?
यंदा कापूस, उडीद, ज्वारी, हरभरा ही पिकं चांगली येतील आणि पिकांना भावही चांगला मिळेल
वाटाणा, बाजरी, गहू, करडई ही पिकं मध्यम स्वरूपात येतील.
एकंदरीत देशात पीक चांगलं येईल.
बळीराजाला मात्र चिंता जाणवेल, कारण पिकांना भाव मिळणार नाही.
लवकर येणाऱ्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.
देशातील रोगराईबद्दल काय आहे भेंडवळची भविष्यवाणी?
यावर्षीही रोगराई राहणार नाही
कोरोनासारख्या महामारीतून यावर्षभरात तरी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. देशात रोगराई राहणार नाही.
राजकीय क्षेत्राबद्दल काय आहे भेंडवळची भविष्यवाणी?
देशाच्या राजाची गादी कायम राहणार
सत्ता पालट होणार नाही.
देशावरील संकटावर काय आहे भेंडवळची भविष्यवाणी?
देशाच्या सरंक्षण खात्यावर जास्त दबाव राहणार नाही.
देशाचं संरक्षण चांगलं राहील.
आर्थिक अडचणीत देश असेल. असे भाकित चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सहकारी सारंगधर महाराज यांनी जाहीर केल्याचे संजय कडांडेंकडून कळविण्यात आले आहे .
आपल्या प्रतिक्रिया द्या....