नागभीड :शंकरपूर पासून जवळच असलेल्या नागभीड तालुक्यातील कानपा येथील मनोज पांडव यांच्या झोपडीमध्ये बांधून असलेल्या शेळी व दोन बकऱ्या यांना मारून लहान असलेल्या दोन बकऱ्या जंगलात नेऊन फस्त केल्या ही घटना दिनांक 28 फरवरी 23 ला रात्र एक वाजता घडली या घटनेमुळे गावात दहशत निर्माण झाली असून मनोज पांडव यांचे नुकसान झाले आहे त्यामुळे वनविभागाने त्याला तात्काळ मदत द्यावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.
मनोज पांडव यांचे रेल्वे स्टेशन भागात शाळेला लागून मकान आहे रात्र एक वाजताच्या सुमारास बिबट्याने झोपडीचे फाटक तोडून शेळी व तिच्या दोन लहान बकऱ्यांना जागीच मारले व शेळीला ओढत अंगणात आणून टाकले व लहान बकऱ्यांना घेऊन जंगलात पळ काढला सकाळी मनोज पांडव जागा होऊन अंगणात आला असता त्याला शेळी अंगणात मरून पडलेली दिसली व दोन्ही लहान बकऱ्या गायब असल्याने इतरत्र शोधून पाहिले पण काहीच ठाव ठिकाणा लागला नाही नंतर त्याने वनविभागाला कळविले असता वनविभागाचे कर्मचारी मृत शेळीचा पंचनामा केला परंतु बिबट्याने पळवून नेलेल्या व जंगलात नेऊन फस्त केलेल्या लहान बकऱ्यांचा तपास मात्र केला नाही बिबट्याने नेलेल्या बकऱ्या तुम्हीच शोधून काढा असे सांगून वन कर्मचाऱ्यांनी बकऱ्या शोधून काढण्याची आपली जबाबदारी नाही असे सांगितले व आपल्या जबाबदारी पासून हात झटकले त्यामुळे वन कर्मचाऱ्यांची भूमिका ही मनोज पांडव याला मदत मिळवून देण्यास संशयास्पद असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली
सध्या उन्हाळ्याची चाहूल लागत असून रात्रीच्या वेळेस या भागातील बरेच नागरिक आपल्या कुटुंबासह अंगणात झोपतात त्यामुळे या बिबट्यामुळे मानवी जीव तसेच पाळीव प्राणी यांच्या जीवनास धोका निर्माण झालेला आहे करिता वनविभागाने या बिबट्याचा तुरंत बंदोबस्त करावा व मनोज पांडव यांना शेळी व दोन लहान बकऱ्यांची नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात यावी व अशी मागणी कानपा येतील नागरिकांकडून होत आहे