बुलढाण्याचे माजी आमदार आणि भाजप नेते विजयराज शिंदे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. हे बस कारंजा आगराची असून कारंजा ते अकोला बसचा सद्याच काटेपूर्णा जवळ अपघात झाला.या घटनेत
आमदार विजयराज शिंदे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले व सुदैवाने विजयराज शिंदे यांच्यासह त्यांचे सहकारी या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत.अपघातात माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यासह सहकारी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अकोल्यातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, विजयराज शिंदे हे अमरावती येथे खासदार बोंडे यांच्या भेटीसाठी निघाले होते. अकोल्या वरून समोरून येणाऱ्या बसने शिंदे यांच्या कारला धडक दिली. यानंतर कारच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. कारला बस धडकताच एअरबॅग उघडल्याने जीवित हानी टळली. स्वतः शिंदे आणि त्यांचा कारचालक दोघेही जखमी झाले आहेत. विजयराज शिंदे यांच्या कारला ज्या बसने धडक दिली तो मोबाईलवर बोलत असल्याचे सांगण्यात येत आहे. कारचा अपघात होण्याआधी विजयराज शिंहे यांनी अकोला दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विमानतळावर भेट घेतली होती. या भेटीनंतर खासदार भोंडे यांच्याकडे जात असताना दुपारी 12 वाजेदरम्यान हा अपघात घडला. दरम्यान शिंदे यांचे अनेक समर्थक अकोला कडे रवाना झाल्याचे कळते.