कारंजा लाड -- साऱ्या जगाला अहिंसा सत्य मानवतेची शिकवण देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आपल्या अहिंसक आंदोलनाच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आणि भविष्यात देशात व्देषाचे बीज पेरल्या जाऊ नये यासाठी प्रेमाची शिकवण दिली पण आज देशात हिंसा व व्देष पसरविण्याचे काम होत असुन महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांचे विचार आजच्या काळात या गुंतागुंतीच्या जीवनात प्रेरणादायी ठरणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव व बुलढाणा जिल्हा सह प्रभारी दिलीप भोजराज यांनी केले
कारंजा लाड शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने स्थानिक विश्राम गृहावर महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त आयोजित आदरांजली सभेत दिलीप भोजराज अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन करतांना बोलत होते.
देशाला जसी जवानांची गरज असते तसी शेतकऱ्यांची सुध्दा गरज भासते हे ओळखूनच माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा देऊन दोघांचेही महत्त्व अधोरेखित केले
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या फोटोला हार अर्पण करून आदरांजली अर्पण केली
यावेळी ॲड संदेश जैन जिंतुरकर, प्रदिप वानखडे, ॲड वैभव ढगे, यांनी आपले मनोगत व्यक्त करुन गांधीजी व शास्त्रीजींच्या जीवनावर प्रकाश टाकला
या कार्यक्रमाला संदेश जैन जिंतुरकर, अमीर खान पठाण, रमेश पाटील लांडकर, युसुफ भाई जट्टावाले, प्रदिप वानखडे, मो.राजिक , जफर खान, प्रफुल्ल गवई,इमरान खान , मो. फिरोज भाई आदी कार्यकर्ते उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन वाशिम जिल्हा एन एस यु आय चे उपाध्यक्ष अक्षय बनसोड यांनी केले.