कारंजा (दत्त) येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दि. १ जानेवारीपासून श्री.नॄसिह सरस्वती स्वामी गुरु महाराज शैलगमण यात्रोत्सवाला सुरुवात झाली.या गुरु महाराजांच्या उत्सवामध्ये अनेक कलावंत आपली सेवा देतात.अशीच कारंजा येथे दिपस्तंभ महिला भजनी मंडळींनी आपली भजन रुपी सेवा श्री गुरु महाराज चरणी अर्पण केली.
श्री.नृसीह सरस्वती स्वामी महाराजांचा यांच्या ७२५ वा जन्मोत्सव निमित्य, दि.२९ जानेवारी मौनी अमावस्येला सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत दिपस्तंभ महिला भजनी मंडळ कारंजा दत्त याची भजन रुपी सेवा श्री चरणी अर्पण केली.या महिला भजनी मंडळींना हार्मोनीयम वादक देवेंद्र वरघट व तबला वादक रामभाऊ खडसे यांनी उत्तम साथ दिली.अश्विनीताई सस्तकर मार्गदर्शक म्हणून लाभल्या.दिपस्तंभ भजनी मंडातील अध्यक्ष सौ.मेघा आशिष गुल्हाने,उपाध्यक्षा सौ.शितल अजय काकडे व सहभागी,सदस्या सौ. वंदनाताई झोपाटे,सौ नेहाताई गुल्हाने,सौ.अनिताडांगे,सौ.हेम लता डाहाके,सौ.वैशाली सरोदे,सौ दिपा पाटे,सौ.सुर्वना गुल्हाने,सौ.कल्पना राठोड,सौ.सोनू धानोरकर, सौ.प्रतिक्षा देसाई,सौ.अल्का चवरे,सौ.सुभदा वानखेडे,सौ. वैष्णवी झोपाटे,निशा राठोड कु.नेहा शिशेकर कु.हर्षाली शिवाजी गायकवाड.तसेच बालकलाकार कु.मैत्री अमोल डांगे,कु.माऊली राठोड,कु. मुन्मई गुल्हाने,कु.माही गुल्हाने व प्रथमेश संतोष डहाके यांनी भजन सेवेला शुशोभीत केले. सर्व भजनी महिलांचा श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थान कडून सत्कार करण्यात आला. असे वृत्त मिळाल्याचे ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी कळवीले.