वाशिम : जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात असणाऱ्या ग्राम रुईगोस्ता येथील हवामान अभ्यासक गोपाल गावंडे हे आपल्या अचूक अंदाजाबद्दल सर्वदूर सुप्रसिद्ध असून, जिल्ह्यातील शेतकरी व ग्रामस्थांना त्यांच्या हवामान अंदाजाची प्रतिक्षा असते.बरेच वेळा विदर्भ मराठवाडयातील शेतकरी आणि ग्रामस्थ हे,हवामान अभ्यासक गोपाल गावंडे यांच्या हवामान अंदाजाप्रमाणे आपल्या शेतिपयोगी कामकाजाचे पूर्वनियोजनही करीत असतात. त्यामुळे त्यांच्या हवामान अंदाजाची त्यांची चाहते मंडळी, चातक पक्षाप्रमाणे प्रतिक्षा करीत असतात.दि. 09 फेब्रुवारी रोजी आमचे जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांचेशी भ्रमणध्वनीवरून बोलतांना त्यांनी सांगीतले की, उद्या दि. 10 फेब्रुवारी पासून ते दि. 14 फेब्रुवारी पर्यंत महाराष्ट्रातील काही भागात, ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह गारपिटी घेऊन मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दि 10 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भासह सर्वच जिल्ह्यात कोठे हलका रिमझिम, काही भागात मुसळधार तर कोठे साधारण पाऊस पडणार आहे. तसेच मध्यप्रदेश व महाराष्ट्रात दि. 14 फेब्रुवारी 2024 पर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हा वळवाचा अवकाळी पाऊस असून कोठे गारपिट, कुठे विजा कोसळणार तर यावेळी थंडगार वारे वाहणार असण्याची सुद्धा शक्यता आहे. असा अंदाज हवामान तज्ञ गोपाल गावंडे यांनी व्यक्त केला असल्याचे संजय कडोळे यांनी कळवीले आहे .