अकोला, : मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ अकोला जिल्ह्यातील अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांना करून देण्यासाठी प्रत्येक तालुका, मनपा व नगरपालिका स्तरावर शनिवार व रविवारी (२४ व २५ ऑगस्ट) विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, विविध विभागांच्या समन्वयाने गरजूंच्या अर्जांची पूर्तता करून घेण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार आणि समाज सेवक रजत गजानन तिवारी यांनी केले आहे. सर्व तालुका, मनपा, नप स्तरावर शिबिराच्या कार्यवाहीसाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी, नप मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व गृहपाल यांना जबाबदारी देण्यात आली आहे. शिबिरांचे आयोजन करून योजनेचे अर्ज ग्रामसेवक व तलाठी यांच्यामार्फत परिपूर्ण भरून घेण्यात यावे. आरोग्य विभागाने अर्जदार यांना आवश्यक असलेल्या उपकरण साहित्याबाबत प्रमाणपत्र सुलभतेने उपलब्ध करून द्यावे. प्राप्त झालेल्या अर्जाची तपासणी करून परिपूर्ण माहिती व अर्ज समाज कल्या