कारंजा : (संजय कडोळे यांचे कडून) "भाजपा पक्षा मध्ये गेल्या चाळीस वर्षापासून कार्यरत असतांना, पक्षाच्या संगठना करीता मी तन मन धनाने सेवारत राहीलो. पक्षात अनेक चढऊतार पहात असतांना, स्व.अटलजी वाजपेयी, स्व प्रमोदजी महाजन स्व गोपिनाथजी मुंडे, नितीनजी गडकरी यांच्या सोबत राहून निष्काम सेवा करण्याचे आणि संपूर्ण वाशिम जिल्ह्यात भाजपाचे संगठन करण्याचे भाग्य मला मिळाले. या काळात कारंजेकर नागरिकांच्या प्रेमापोटी, पक्षाकडून कारंजा नगर पालिकेत तीन वेळा नगराध्यक्ष म्हणूनही मला कारंजा नगरीची सेवा करण्याची संधी मिळाली.

त्याचे सर्वस्वी श्रेय माझे कारंजेकर चाहते व निष्ठावंत कार्यकर्ते यांनाच जाते . परंतु मागच्या पाच वर्षापूर्वी - तेव्हापासून, मी राजकारणापासून अलिप्त रहात विश्रांती घेतली होती. त्यामागे माझी कौटूंबिक, वैयक्तिक आणि राजकिय कारणे सुद्धा होती. परंतु माझ्या या निर्णयामुळे माझेवर नितांत प्रेम करणारे माझे निष्ठावंत कार्यकर्ते मात्र दुखावले जाऊन, वेळोवेळी माझे जवळ आपली उघड उघड नाराजी व्यक्त करीत, आपणास कारंजा नगरीचा आणि येथील राजकिय परिस्थितीचा अभ्यास असल्यामुळे कारंजा नगरीच्या विकासाकरीता आपण राजकारणात सक्रिय असणे आम्हासाठी गरजेचे असल्याचे मला म्हणत होते .
त्यामुळे आपल्या चाहत्यांच्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्याच्या इच्छेचा सन्मान करून मी राजकारणात परत सक्रिय होण्याचा निर्णय घेऊन, कार्यकर्त्यांच्या हितासाठी त्यांच्या सोबतीने, पूर्ण ताकदीने आगामी नगर परिषद निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
" असे वृत्त महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांना दिलेल्या आपल्या मुलाखतीमध्ये कारंजा शहराचे माजी नगराध्यक्ष जेठूसेठ उर्फ नरेंद्रजी गोलेच्छा यांनी सांगीतले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....