अकोला- विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात चांगला अभ्यास करून विव्दत्तेने पुढे जात असतांनाच,शिस्त संस्कार आणि आई वडील व गुरूजणांच्या आज्ञा पाळाव्यात. आपण जन्माला आलोत त्या समाजाचे आणि राष्ट्राचेही आपण पूत्र आहोत, याची कृतज्ञतेने जाणीव ठेऊन कठोर मेहनतीने यशाच्या दिशेने जावे.असे मार्गदर्शनपर प्रतिपादन समाजसेवी पर्यावरण मित्र विवेक पारसकर यांनी केले.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शालेय बुट आणि नोटबुक च्या वाटपाचा उपक्रम ( स्कूल शुज) आयोजित केला होता.त्यावेळी अकोला येथे हरिहर पेठेतील श्री शिवाजी विद्यालयातील या कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी ७५ विद्यार्थ्यांना बुटांचे व ईतरांना नोटबुक आणि पेन वाटप करण्यात आले.आगामी १४ ऑगस्ट रोजी बाळापूर तालुक्यातील निंबा येथील जि.प.प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वितरणाचा उपक्रम आयोजित केलेला आहे.

लोकस्वातंत्र्यचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख, (निंबेकर) यांच्या अध्यक्षतेखाली सध्याच्या बुट वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.ईलना राष्ट्रीय सचिव निवडीबध्दल त्यांचा व अतिथींचे याप्रसंगी सत्कार करण्यात आले.यावेळी खंडेलवाल समाजाचे माजी अध्यक्ष सुरेशकुमारजी खंडेलवाल अतिथी म्हणून तर पत्रकार महासंघाचे केन्द्रीय सचिव राजेन्द्र देशमुख,अशोककुमार पंड्या,विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोज देशमुख यांची व्यासपीठावर, आणि केन्द्रीय उपाध्यक्ष,ज्येष्ठ पत्रकार प्रदिप खाडे,मार्गदर्शक तथा साहित्य व संस्कृती मंडळ सदस्य पुष्पराज गावंडे,के.व्ही.देशमुख अंबादास तल्हार,दिलीप नवले या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सर्वप्रथम सामाजिक उपक्रमांचे अधिष्ठाण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,संत गाडगे महाराज यांना हारार्पण वंदन व त्यांचेसोबत शिक्षणमहर्षी, स्व.डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख व शिवाजी संस्थेचे माजी अध्यक्ष स्व.वसंतरावजी धोत्रे यांना स्मृतीदिनी अभिवादन करण्यात आले.त्याचप्रमाणे क्रेन मशिनखाली बळी गेलेले शहापूर जवळील समृध्दी महामार्गावरील मृत श्रमिक,मराठवाड्यातील ज्येष्ठ पत्रकार प्रशांत जोशी,निसर्गकवी ना.धो.महानोर व ज्येष्ठ विचारवंत प्रा.हरी नरके यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या दि.२९ जुलैच्या शालेय साहित्य वाटपानंतर हा दुसरा उपक्रम होता. पदाधिकाऱ्यांच्या त्यातील उर्वरीत स्वनिधीतून हा उपक्रम राबविला जाणार होता.परंतू लोकस्वातंत्र्यचे जिल्हा मार्गदर्शक अशोककुमार पंड्या आणि सुरेशकुमारजी खंडेलवाल यांनी याकामी पुढाकार घेऊन त्यासोबत कमल वर्मा,दिपक शाह,विजय चावचारिया व राजेन्द्र तापडिया यांच्या आर्थिक सहयोगातून हा उपक्रम घडवून आणला.यावेळी मुख्याध्यापक मनोज देशमुख यांनी प्रास्ताविकातून लोकस्वातंत्र्यच्या नियमित कृतिशील वाटचालीचे कौतुक करून आभार व्यक्त केले.संजय देशमुख यांनी अध्यक्षीय मधून, तर अतिथी व प्रमुख उपस्थितांनी विद्यार्थ्यांना समयोचित मार्गदर्शन केले.
लोकस्वातंत्र्यच्या अकोला जिल्हा सचिव सौ.किर्ती मिश्रा यांच्या बहारदार संचलनाखाली झालेल्या या कार्यक्रमाला हनुमंत सपकाळ पंकज देशमुख दिलीप देशमुख निलेश देशमुख दयारामजी गायकवाड ,सौ.कराळे, श्रीमती मराठे,श्रीमती नेमाडे, श्री काळुसे, प्रशांत देशमुख ह्या शिक्षक,शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.आभारप्रदर्शन सौ.कराळे यांनी केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....