कारंजा (लाड) : शांतता,संयम,सलोख्याची सर्वधर्मिय समभावाची- अतिप्राचिन,ऐतिहासिक, आध्यात्मिक,धार्मिक,सांस्कृतिक, शैक्षणिक,व्यापारी असलेल्या कारंजा नगरीला महाराष्ट्र शासनाने तिर्थस्थळ घोषीत करून, तिर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार येथील विकास केला तर येथे केवळ भारतातूनच नव्हे तर संपूर्ण जगभरातून दरडोई हजारो जैन अनुयायी, दत्तउपासक,यात्रेकरू व पर्यटकांची गर्दी वाढून,स्थानिक सर्वधर्मिय नागरीकांना रोजगाराचे साधन उपलब्ध होईल. आणि लघुव्यवसाय व रोजगार वाढला म्हणजे त्यातून आपसुखच कारंजा शहरातील नागरिकांचा विकास, बुलडाणा जिल्ह्यातील श्रीक्षेत्र शेगाव तिर्थक्षेत्राच्या धर्तीवर साधता येईल. स्थानिक विद्यार्थ्याकरीता उच्च शिक्षण तंत्र शिक्षणाची दालने उघडता येईल. उद्योगधंदे सुरु होऊन स्थानिक मजूर,कामगार,सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल.असे आपले प्रांजळ मत असल्यामुळेच आपण तिर्थक्षेत्र विकास आराखड्याची मागणी रेटून धरली असल्याचे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग समाजसेवक संजय कडोळे यांनी म्हटले आहे.