चंद्रपूर, दि. 2 : मुनवर वि. मोहसिन खान या पोटगी केसमध्ये एक तीनचाकी ऑटो जप्त करून त्याची किंमत 35 हजार ते 40 हजार रुपये अधिकृत करण्यात आली आहे. सदर ऑटोचा लिलाव पो. स्टे. चंद्रपूर शहर येथे 4 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता जाहीर लिलाव करण्यात येणार आहे. उपरोक्त ऑटो खरेदी करणा-या निवेदाधारकांनी अनामत रक्कम 3600 रुपये भरणा करून आपले नाव लवकरात लवकर नोंदवावे, लिलावासंबंधी सर्व अधिकार, चंद्रपूर शहर पोलिस ठाणेदार यांना राहणार असल्याचे कळविण्यात आले आहे.