जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत येणा-या लोक अभिरक्षक कार्यालयाचे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या परिसरात नविन कार्यालयात स्थानांतर आणि उद्घाटन थाटात संपन्न झाले.
जिल्हा व सत्र न्यायाधिश क्र.२ शयना पाटील यांचे हस्ते तसेच जिल्हा व सत्र न्यायाधिश क्र .३ विवेक गव्हाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत फीत कापून उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी डि.जी.पी. आर आर. देशपांडे यांचे सह अकोला बार असोशिएशन चे अध्यक्ष अॅड. हेमसिंग मोहता, सचिव विनय यावलकर, सह सचिव शिवम शर्मा, सह सचिव दुश्यंत धोत्रे, सरकारी अभियोक्ता रेलकर, अॅड. अकोटकर, अॅड. गोदे, अॅड. खोत आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी नुतन इमारतीचा उद्घाटन सोहळा अधिकृतरित्या संपन्न झाल्याचे मान्यवरांनी जाहिर केले. जनसेवेसाठी असणा-या कार्यालयात गरजूंना पुर्णपणे न्याय मिळण्यासाठी लोक अभिरक्षक कार्यालय सर्वतोपरी मदत करेल. अशी ग्वाही प्राधिकरणाचे सचिव योगेश सु. पैठणकर यांनी मान्यवरांना दिली. याप्रसंगी मान्यवरांचे स्वागत मुख्य लोक अभिरक्षक एन. एन. उंबरकर, उपमुख्य लोक अभिरक्षक पी. बी. होनाळे, उपमुख्य लोक अभिरक्षक डि.डि. गवई, सहा. लोक अभिरक्षक एम. पी. सदार, सहा. लोक अभिरक्षक ए. ए. हेडा, सहा. लोक अभिरक्षक भारती राऊत, सहा. लोक अभिरक्षक ए. बी. डोगरे यांनी केले. उद्घाटन कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लोक अभिरक्षक कार्यालय तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचारी तसेच पि.एल.व्हि. यांनी अथक परिश्रम घेतले.