कारंजा (लाड) : कारंजा तालुक्याच्या ग्रामिण खेड्यापाड्यातील गरजू दिव्यांग व्यक्तिंना जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत,तिन चाकी सायकल,कुबड्या,काठ्या व्हिलचेअरचा लाभ मिळणे अपेक्षित आहे.त्याच प्रमाणे,कारंजा शहरातील नागरी वस्तीत राहणाऱ्या दिव्यांगाची संख्या देखील खूप मोठ्या प्रमाणात असून,ह्या अस्थिव्यंग आणि ज्यांना चालताच येत नाही अशा दिव्यांगाना तसेच पक्षघात किंवा अर्धांगवायू झालेल्या दिव्यांगाना,आमदारच्या विकास निधी मधून किंवा कारंजा तालुक्यातील खेडोपाडीच्या दिव्यांगासह शहरी नागरी वस्तीतील दिव्यांगाना विनाअट साधने जसे की-तिन चाकी सायकल,व्हिल चेअर्स,कुबड्या, काठ्या,अंधाच्या काठ्या देण्याची मागणी कारंजा शहरातील दिव्यांग बांधवाकडून होत आहे. तरी महायुती शासनाने कारंजेकर दिव्यांगाना त्यांच्या हक्काच्या साधना पासून वंचित न ठेवता दिव्यांगाच्या मागणीची दखल घेऊन त्यांना आवश्यक साधने पुरविण्याची मागणी महाराष्ट्र अपंग संस्था कारंजाचे अध्यक्ष तथा दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी केली आहे.