वाशिम : पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे वेळी अवेळी पडणारा अवकाळी पाऊस,त्यामुळे पिक उत्पन्नाची बिघडलेली परिस्थिती,सततची नापिकी,शेतमालाचे पडलेले भाव,शेती उत्पन्नाला हमीभाव नसणे,नुकसान भरपाई व पिकविम्याच्या रक्कम देयकाबाबत शासनाची उदासिनता व त्यामुळे कर्जबाजारी होऊन अगदी मेटाकुटीला आलेला शेतकरी ह्यामुळे केवळ राज्यातच नव्हे तर अख्ख्या भारतात शेतकरी आत्महत्या ग्रस्तांची सर्वाधिक कुटंबे असलेल्या यवतमाळ वाशिम मतदार संघातील शेतकरी राजा सत्ताधारी महायुती सरकारवर पूर्णतः संतापलेला असून,नाराज असल्याचे मतदार संघातील निवडणूकीचे चित्र आहे.तशातच मतदार संघात सक्षम नेते असतांनाही,त्यांना डावलून,महायुतीने मतदार संघ मराठवाड्याच्या दावणीला बांधला असल्याने,ह्या मतदार संघामधील शेतकऱ्यांनी महायुतीला धडा शिकविण्याचा निर्णय घेऊन,परिवर्तनाच्या उद्देशाने महाविकास आघाडीचे स्थानिकचे लोकप्रिय उमेद्वार संजय देशमुख यांनाच मतदान करून निवडून लोकसभेत पाठविण्याचा निर्णय घेतला असल्याचे मत स्वतः शेतकरी असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी नगराध्यक्ष अरविंद लाठीया यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांचेशी वार्तालाप करतांना बोलून दाखवीला आहे.तसेच याबाबत आवाहन करतांना त्यांनी सांगितले की, "आपला देश हा शेतीप्रधान देश आहे.आपला शेतकरी हा केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला अन्नधान्याचा पुरवठा करीत असतो.त्यामुळे आपली शेती वाचली पाहिजे.आपला शेतकरी वाचला पाहिजे.आणि त्याकरीता कोणतीही जात पात धर्म निवडणूकीच्या आड न येऊ देता, निव्वळ शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वांनी येणाऱ्या शुक्रवारी दि. 26 एप्रिल 2024 रोजी, आपआपल्या गावातील मतदान केन्द्रावर जाऊन आपल्या मतदार संघातील महाविकास आघाडीचे आपले स्थानिकचे, लोकप्रिय उम्मेद्वार संजय देशमुख यांच्या "मशाल" या चिन्हा समोरील बटण दाबून त्यांना प्रचंड बहुमतांनी निवडून दिले पाहिजे." असे आवाहन मतदारांकरीता त्यांनी केले आहे.