अकोला : जागतिक अंध दिना निमित्त (पांढरी काठी दिन) अंध व्यक्तींकरीता CPR प्रथमोपचार निशुल्क कार्यशाळा चे आयोजन रविवार दि.16/10/22 रोजी दुपारी 12 ते 3 या दरम्यान अजिंक्य फिटनेस पार्क, केडिया प्लॉट, उमरी रोड, अकोला.येथे आयोजित करण्यात आले आहे.सध्याच्या ह्या धकाधकीच्या जीवनात अपघात किंवा ह्दय विकाराने येणा-या मृत्युच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. अश्या प्रसंगी तुमच्या जीवलगास तात्काळ वैद्यकीय मदत मिळेपर्यंत आपण काय करावे जेणेकरून त्यांचे प्राण वाचविता येतील हेच शिकुन समजवुन घेण्याकरीता "अंध व्यक्तींकरता"कार्यशाळेचे आयोजन केले आहे यामध्ये शास्त्रीय माहिती, प्रत्यक्ष मानवी रबरी पुतळ्यावरती सराव(दोन व्यक्तींमध्ये एक), प्रश्न उत्तरी चर्चा व प्रमाण पत्र इत्यादीचा समावेश राहील. यामध्ये अकोल्यातील नामवंत डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळे करता 18 वर्षावरील अंध नागरिकांनी (स्त्री ,पुरुष )आपली नोंदणी करून कार्यशाळेमध्ये सहभागी व्हावे, चाळीस व्यक्तींनाच सहभाग घेता येईल. अधिक माहिती करता अजिंक्य फिटनेस पार्क येथे प्रत्यक्ष नातेवाईक मित्रमंडळी द्वारा संपर्क साधावा.तसेच खालील क्रमांकावर ती आपण माहिती घेऊ शकता - 9823084321, 9822716266. ह्या कार्यक्रमाचे आयोजक: शुभमकरोति फाउंडेशन,जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन GPA, अजिंक्य फिटनेस पार्क, अकोला. सहकार्य: इंडियन रेडक्रॉस सोसायटी-युनिट अकोला, जिजाऊ फाउंडेशन-अकोला, नेत्र कमलांजली हॅास्पीटल ,अकोला, डॉ.थोरात आय हॉस्पिटल अकोला.हे असुन ह्या कार्यक्रमाचा लाभ घेन्याचे आवाहन करण्यात आले आहे