गोंदिया जिल्ह्यातील SIT probe सावरटोली येथील महिलेवर झालेल्या सामूहिक अत्याचाराची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आयपीएस दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एसआयटीमार्फत करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
सामूहिक अत्याचार SIT probe प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात प्रचंड रोष पसरला आहे. शनिवारी आ. सहषराम कोरोटे, अभिजित वंजारी, गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दिलीप बन्सोड व पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी त्याची गंभीर दखल घेत हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्याचे व एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे निर्देश दिले. यासंदर्भात पोलीस महासंचालकांशीदेखील चर्चा केली.
चित्रा वाघ यांची भेट
बलात्काराच्या केसेस SIT probe निकाली काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी विशेष न्यायालय असावे, अशी मागणी आपण राज्य सरकारकडे करणार असून, त्याची अंमलबजावणी झालेली दिसेल, असा दावा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला. गोंदियाच्या अत्याचार पीडितेची शनिवारी हॉस्पिटलमध्ये जाऊन वाघ यांनी भेट घेतली. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. पण पीडितेने डॉक्टरांकडे सांगितलेल्या माहितीनुसार चार आरोपी आहेत.