मालेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा बोरगाव येथील शिक्षक दिलीप धोंडूजी सोनुने यांचा अपघाती मृत्यू झाला असता दि अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पगारदार कर्मचारी असल्याने शिक्षकाच्या पत्नीला तीस लाख रुपयांचा धनादेश बँकेच्या वतीने देण्यात आला बँकेच्या मालेगाव परिसरातील रहिवासी तथा जिल्हा परिषद शाळा बोरगाव येथील कार्यरत शिक्षक श्री दिलीप धोंडूजी सोनुने यांचा ऑक्टोबर 2023 मध्ये अपघातात मृत्यू झाला होता त्यांची बँके कडून पगारदार अपघात विमा पॉलिसी काढण्यात आली होती त्यानुसार दि अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा मालेगाव यांनी पगारदार अपघात विमा साठी पाठपुरावा केला असता बँकेच्या वतीने काढलेल्या पगारदार अपघात विम्याची 30 लाख रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली हा 30 लाख रुपयांचा धनादेश अपघातातील मृतक कै. दिलीप धोंडुजी सोनुने यांच्या पत्नी अनुप्रिया दिलीप सोनुने यांना देण्यात आला . बँकेचे अध्यक्ष माननीय डॉ संतोष कुमार कोरपे साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य साहेब यांच्या मार्गदर्शनात सदर विम्याचा धनादेश बँकेचे संचालक माननीय दिलीपरावजी जाधव साहेब यांच्या हस्ते तसेच शिक्षक संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मृतकाच्या वारसास प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हस्तांतरित करण्यात आला सदर कार्यक्रमास बँकेचे संचालक माननीय दिलीपरावजी जाधव साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. गणेश भाऊ उंडाळ साहेब शिक्षक संघटनेचे संचालक श्री मंचकराव तायडे सर व श्री प्रशांत वाझुळकर सर मालेगाव शाखेचे व्यवस्थापक , श्री दत्तात्रय चौधरी मार्केटिंग ऑफिसर श्री देवानंद सुर्वे , रोहिणी ठाकरे ,निखिल राठोड, शिल्पा निकस ,उमेश कुटे, विनोद ढोकणे व इतर कर्मचारी , संघाचे कार्यालयीन सचिव महादेवराव ठाकरे व इतर सचिव यांची उपस्थिती होती.