नेहरू युवा केंद्र व युनिसेफ ,क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय भारत सरकार आयोजित राज्यस्तरीयअभिरुप युवा संसदेत 36 जिल्ह्यातून 72 संसद प्रतिनिधि येणार आहेत.त्यापैकी एक म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात असलेल्या निलज गावातील तेजस राजेंद्र दोनाडकर हा तरुण युवा संसदेत चंद्रपूर जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे.
विशेष म्हणजे नुकत्याच भारत सरकार द्वारे दिल्ली येथे झालेल्या मेरी माती मेरा देश या अमृत कलश यात्रेकरीता सुद्धा तेजस ची निवड झाली होती .
ही अभिरुप युवा संसद मुंबई येथे 19 ते 20 नोव्हेंबेर रोजी संपन्न होणार आहे.दोन दिवस चालणाऱ्या या संसदेत राजभवनविधानभवन ,आणि मंत्रालयाच्या भेटीसुद्धा या माध्यमातून घेतल्या जाणार आहेत. तरी तेजसच्या निवडीच कौतुक केल जात आहे. या निवडिच श्रेय त्याने त्याची आई आणि नेहरू युवा केंद्र चंद्रपूरचे कार्यक्रम अधिकारी समशेर सुभेदार यांना दिलेल आहे ।