वाशिम : "आपल्या न्यायहक्काकरीता समाजातील प्रत्येक व्यक्ती,संघटना,परिषदा ह्या शासनाविरुद्ध आक्रोश व्यक्त करीत नेहमीच आंदोलन करीत असतात." परंतु आंदोलन संवैधानिक मार्गाने कसे करावे ? कोणत्या मागण्याकरीता करावे ? आणि आपण केलेले आंदोलन यशस्वी कसे करावे ? हे विदर्भ लोककलावंत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त असलेले दिव्यांग जनसेवक, ज्येष्ठ साहित्यिक,पत्रकार तथा लोककलावंत संजय मधुकरराव कडोळे यांनी " लोककलावंताच्या न्यायहक्ककरीता आपल्या यशस्वी आंदोलनाच्या कृतीतून सिद्ध करून दाखवीले आहे." असे गौरवोद्गार श्री गुरुदेव सेवा मंडळ,गुरुकूंज मोझरीचे आजिवन प्रचारक ह.भ.प.लोमेश पाटील चौधरी यांनी काढले आहेत.या संदर्भात महत्वाचे म्हणजे तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक असलेले विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे हे बालपणापासूनच लोककलेमध्ये जीवन जगत असून ते परंपरागत गोंधळी ह्या पौराणिक पुरातन लोककलेचा वारसा चालवितात. ते स्वतः उत्कृष्ट कवी,लेखक उत्कृष्ट साहित्यीक असून गेल्या चाळीस वर्षाचा पत्रकारितेचा त्यांचा दांडगा अनुभव आहे. त्यासोबतच सर्वधर्मिय कलावंताशी त्यांचे जवळून संबंध असल्यामुळे कलाकारांना न्यायहक्क मिळावे म्हणून त्यांनी आपला जीवन संघर्ष चालवीला आहे.गेल्या कित्येक वर्षापासून ते मंत्रालय,सांस्कृतिक विभाग, सामाजिक न्याय विभागाचे मंत्री,आमदार, शासनाचे सचिव व अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन,रजिस्टर पोस्टाने व ईमेल आयडी वर पत्रव्यवहार करून, "वृद्ध साहित्यीक कलाकारांना सरसकट मानधन वाढ करण्याबाबत प्रवृत्त केले." तसेच दि. ०६ डिसेंबर २०२२ च्या कारंजा येथील राज्यस्तरीय कलाकार मेळाव्याद्वारे आणि दि. २४ जानेवारी २०२४ रोजीच्या जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथील "लोककलावंताच्या निर्णायक क्रांतिकारी धरणे आंदोलनाद्वारे" लोककलाकारांच्या योग्य व रास्त मागण्या राज्यशासनाकडे कायदेशीर मार्गाने सादर करून त्याचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व त्यांचे सचिव यांचेकडे पाठपुरावा केला व अखेर दि. १६ मार्च २०२४ रोजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी आचारसांहितेपूर्वी मंत्रीमंडळ घेऊन, वृद्ध कलाकारांना सरसकट ५०००/- पाच हजार रुपये मानधन वाढ केल्याचा शासननिर्णय जाहिर करून तसा शासन आदेश शासननिर्णय क्र वृकमा ४३२१(१५)पू / प्र.क्र. १४५ सां.का. ४ पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग दि १६ मार्च २०१४ लगेच पारीत केला. व तसे थेट मंत्रालयामधूनच पांडे साहेंबा मार्फत,विदर्भ लोककलावंत संजय कडोळे यांना कळविण्यात आले. त्यामुळे खरोखरीच विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे दि २४ जानेवारी २०२४ चे निर्णायक क्रांतिकारी धरणे आंदोलन १००% यशस्वी झाले असून या यशाचे सर्वस्वी श्रेय अध्यक्ष संजय कडोळे व त्यांच्या विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे असल्याचे गौरवोद्गार ह.भ.प. लोमेश पाटील चौधरी यांनी काढले आहेत.