बालविवाह प्रथा ही समाजाला लागलेली किड आहे, बालविवाह विरोधी कठोर कायद्यामुळे समाजातील बालविवाह वरकरणी कमी झाल्याचे दिसत आहे. परंतू तरूणांनी अल्पवयीन मुलींना लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये घरी ठेवून १८ वर्षानंतर लग्न करतात. कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी अल्पवयीन मुलामुलींनी पर्याय शोधला आहे. त्यामुळे बालविवाहाच्या कुप्रथा कायद्याने नव्हे तर समाजात जनजागृती करून नियंत्रणात ठेवणे शक्य आहे. याचकरीता भारतीय नोबेल पारितोषिक विजेते कैलास जी सत्यार्थी यांच्या प्रेरणेतून कैलास सत्यार्थी फाऊंडेशन नवी दिल्ली पुरस्कृत बाल विवाह मुक्त भारत अभियान राबविण्यात आले आहे.

दिनांक १६ ऑक्टोबर २०२३ रोजी स्व.रूख्माबाई पाल बहूउद्देशिय शिक्षण संस्था वर्धा च्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी तालुक्यातील रामपूरी व तुकूम, नागभिड तालुक्यातील कोजबी, चारगांव चक, चारगांव माना, तळोधी नवानगर, तळोधी चिटणीस पुरा वार्ड नं 7, शारदा महिला मंडळ , तळोधी पोलीस स्टेशन , बाळापूर, बोंड, सोनूली, येनोली, राजोली,आणि सिंदेवाही तालुक्यातील देलनवाडी, आंबोली, सिंदेवाही, चिटकी, मुरपार, सरडपार, नवेगाव (लोन), लोनखैरी, नवेगाव टोली, गोविंदपूर, चिकमारा, पेटगांव, विरव्हा (जूना), विरव्हा (नवा), नवेगाव (चक), मुरमाडी, किन्हीं, गोविंदपुर, मेंढ़ा, नवरगांव, इत्यादी ४० गांवखेडे, दोन शाळा व एक पोलीस स्टेशन यांमधून बाल विवाह मुक्त भारत अभियानांतर्गत दिप रैली, व शपथ, स्लोगन, गितगायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात गावातील आशा, अंगणवाडी शिक्षिका, अंगणवाडी सेविका, सरपंच, पोलीस पाटील, बचतगट कार्यकर्त्या, गावातील तरूण- तरूणी, व इतरही कर्मचारी वर्ग तसेच प्रतिष्ठित पुरूषांनी सहभाग नोंदविला. या वेळी अभियानात सहभागी व्यक्तींनी बालविवाह न करण्याचा तसेच बालविवाह करु नका असे ग्रामस्थांना समजून सांगण्याची शपथ घेतली. लपून छपून बालविवाह होण्याची शक्यता दिसल्यास किंवा तशी माहिती मिळाल्यास जबाबदार यंत्रणेला सुचना देण्याचाही संकल्प करण्यात आला. तसेच समाजातील कुप्रथा नष्ट करून जीवन प्रकाशमान करण्याचा संदेश देण्यासाठी मेनबत्ती ज्वलन करुन मिनमिनत्या प्रकाशाने उजळलेल्या परीसरातून प्रभातफेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीतून बाल विवाह प्रथा बंद झालीच पाहिजे, अशा घोषणा देवून ग्रामस्थांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.व अनेक ग्रामस्थांना स्वयं प्रेरणेने अभियानाचे महत्व विषद करण्यात प्रामाणिक प्रयत्न केला गेला .
१६ आक्टोबरच्या सायंकाळी ५ ते रात्री ८ चे सुमारास ही जनजागृति मोहीम यशस्वी करण्यात स्व.रूख्माबाई पाल बहूउद्देशिय शिक्षण संस्था सचिव हरिश्चंद्र पाल यांचे मार्गदर्शनाखाली सुरेखा चन्नोडे, अर्चना येवनकर, स्मिता गजबे, दर्शना शेंडे, चांदणी जांभूळकर,शारदा गावतूरे, प्रभा चामटकर , पुष्पा ताई बोरकर, मृणालिनी गुरनूले, शिल्पा मेश्राम, कु.प्रज्ञा मेश्राम, ज्योत्स्ना तुपट, मंगला वासनिक, अंजू कावळे, अल्का चिंचोलकर, शीतल नवघडे, दीपाली नवघडे यांच्या नेतृत्वात जवळपास ३००हून अधिक महिला कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....