कारंजा : कारंजा नगरीची ओळख पुरातन ऐतिहासिक,धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक नगरी असी आहे.येथील गोंधळी नगरमध्ये श्री कामाक्षा देवी मंदिरचे दिपमाळी जवळ, सगोन्या महादेवाचे 1400 वर्षापूर्वीचे प्राचिन शिवमंदिर असून, हा महादेव नवसाला पाहणारा महादेव म्हणून प्रसिद्ध आहे. पूर्वी या शिवमंदिरात आपल्या वरील विघ्नसंकंटे दूर होऊन इच्छा आकांक्षांची पूर्तता व्हावी म्हणून शिवभक्तांची प्रचंड गर्दी व्हायची परंतु कालांतराने येथे भाविकांची वर्दळ कमी झाली.
परंतु नुकतेच करवीर पिठ कोल्हापूर येथील जगदगुरु शंकराचार्य विद्या नृसिह स्वामी हे श्रावण मासां निमित्त श्री गुरुमंदिर येथे आले असतांना त्यांनी गोंधळी नगरमध्ये जाऊन या सगोन्या महादेवाचे दर्शन घेतले आणि हे शिवालय महादेवाचे जागृत ठिकाण असल्याचे सांगीतले. तसेच येथे येणाऱ्या भक्ताच्या मनोकामना पूर्ण होत असल्याचे विषद केले. यावेळी त्यांनी आदिशक्ती श्री कामाक्षा देवीचेही दर्शन घेतले. या प्रसंगी श्री कामाक्षा देवी संस्थानचे दिगंबरपंत महाजन, रोहीत महाजन, गोंधळी अशोक महाजन, संजय कडोळे आदींनी त्यांचे मंदिर समितीतर्फे स्वागत केले. त्यांचे सोबत निरज घुडे, सुनिल बेलोणकर आदी उपस्थित होते.