तालुक्यात भाजपाला बाजार समितीमध्ये प्रवेश करता येणार नसून,डॉ संजय रोठे यांची खेळी यशस्वी ठरणार असल्याचे वृत्त,आमचे तालुका प्रतिनिधी डॉ.कलिम मिर्झा यांनी अगोदरच महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेला कळवीलेले होते. त्यानुसार अखेर शुक्रवार दि.२८ एप्रिल रोजी पार पडलेल्या,मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीचा शनिवार दि २९ एप्रिल रोजी निकाल लागून महाविकास आघाडीला निर्विवाद बहुमत प्राप्त झाले आहे. महाविकास आघाडीने १५ जागांवर विजय मिळवीला असून भाजपा समर्थित शेतकरी आघाडीला केवळ २ जागांवर समाधान मिळाले आहे. यासंदर्भात अधिक वृत्त असे की, मानोरा कृ.उ.बा.स.साठी शुक्रवारी तालुक्यातील बारा मतदान केन्द्रावर निवडणूक पार पडली.सदर निवडणूकीत १२८१ मतदारांपैकी एकूण १२१७ मतदारांनी मतदान केले . ज्यामध्ये सेवा सहकारी संस्था मतदार संघातील ४४२ पैकी ४३९ ; ग्राम पंचायत मतदार संघातून ,७०३ पैकी ६६० ; अडते व्यापारी मतदार संघातून ८८ पैकी ८८ व हमाल मापारी मतदार संघातून ४८ पैकी ४८ मतदारांनी आपला हक्क बजावला.या निवडणूकीत महाविकास पॅनलचे १८ पैकी १५ उमेद्वारानी विजयाचे निशाण फडकविले तर भाजपा समर्थित २ व अपक्ष उमेदवार १ विजयी ठरले आहेत.विजयी उमेदवारामध्ये अडते व्यापारी विजय राठी,अरुण हेडा ; सेवा सहकारी संस्था विमुक्त जाती जमाती मतदार संघातून माणिक पवार,सेवा सहकारी महिला राखीव मधून सौ सिमा पवार, सेवा सहकारी सर्वसाधारण राखीव मधून डॉ संजय रोठे, सचिन रोकडे,विलास पाटील, भुजंगराव राठोड,पुष्पाबाई इंगळे,अरविंद राऊत ; ग्रामपंचायत सर्वसाधारण मधून आशिष पाटील,दिनेश राठोड, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल मधून सुनिल जामदार, ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदार संघा मधून सुनिता मानकर हे विजयी झाले असून भाजपा समर्थित शेतकरी पॅनलचे सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण मतदार संघातून निलेश ठाकरे,व सेवा सहकारी महिला राखीव मधून इंदुबाई इंगोले आणि हमाल मापारी मतदार संघाचे एकमेव अपक्ष उमेदवार अनिस शेख विजयी झाले असल्याचे वृत्त आमचे मानोरा तालुका प्रतिनिधी डॉ कलिम मिर्झा यांनी कळवील्याचे महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.