आरमोरी येथील वडसा टि-पाँइंटवरील पोस्ट ऑफिस समोरील छत्रपती चौकात पोलिस चौकी समोर वडसा मार्गे येणार्या ट्रकने दिलेल्या धडकेत सायकलस्वार महिला जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास घडली.
किरण संजय गोंधोळे (25) रा. आरमोरी (बडी) असे मृतक महिलेचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, किरण गोंधोळे ही महिला कॉन्व्हेन्ट मधुन आपल्या मुलाला आणण्यासाठी टी-पाईटकडून छत्रपती चौकाकडे सायकलने निघाली होती. दरम्यान, पोस्ट कार्यालयासमोरील वळणावर ट्रकने (एमएच-34-एव्ही-1296) जबर धडक दिल्याने साकलस्वार महीलेचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नागरीकांचा जमाव घटनास्थळी दाखल झाला.
ट्रक चालकाचे नाव मनिषकुमार विरबहादुरसिंग वय 36 रा. कोलवारा ,जिल्हा मुझाफरपुर (बिहार) यांच्यावर अप क्रमांक 413/2024 कलम 281 106 (1) भा. न्या.स.2023 सह कलम 184 (2) मो.वा.असे असून त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली . तसेच महिलेचा मृतदेह रुगणालयात शवविच्छेदनास पाठविले. पुढील तपास आरमोरी पोलिस करीत आहेत.
नागरीकांचा जमाव एवढा होता की, काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. या छत्रपती चौकात वारंवार अपघात होत असल्याने तिन्ही रोडवर गतीरोधक उभारण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती.