दोन दिवसापूर्वी केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल वरील कर कमी केला. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने ही राज्य सरकारचा पेट्रोल डिझेल वरील कर कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा अशा मागणीचे निवेदन ब्रम्हपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा ब्रह्मपुरी तालुक्याच्या वतीने तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले.
केंद्र सरकारने सलग दोन वेळा पेट्रोल व डिझेल वरील केंद्र शासनाचा कर कमी करून नागरिकांना दिलासा दिला. या वेळे पेट्रोलवर ९ रुपये तर डिझेल ७.५० रुपयांनी केंद्र सरकारच्या वतीने कमी करण्यात आले. महाविकास आघाडी सरकारने सुद्धा टॅक्स कमी करू अशी घोषणा केली. परंतु ही पोकळ घोषणा असून कोणत्याही प्रकारचा दिलासा नागरिकांना मिळालेला नाही. याकरिता भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज ब्रम्हपुरी येथे निवेदन देण्यात आले. राज्य सरकारने कर कमी न केल्यास भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही भारतीय जनता युवा मोर्चाने याप्रसंगी दिला.
निवेदन देतांना नगरसेवक सागर आमले, साकेत भानारकर, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश ननावरे, जिल्हा सचिव तनय देशकर, जिल्हा कार्य. सदस्य लीलाराम राऊत, शहर उपाध्यक्ष अमित रोकडे, पवन जयस्वाल, सचिव दत्ता येरावार, उपाध्यक्ष बंटी येरावार, नीलजचे सरपंच हेमंत ठाकरे व युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.