ब्रम्हपुरी :- गोरगरीब जनतेला व समाजातील दुर्बल घटकातील नागरिकांना राहण्यासाठी पक्के घरे बांधून देण्यासाठी शासन स्तरावरून रमाई आवास, शबरी आणि पंतप्रधान आवास घरकुल योजना राबवित आहे.यासाठी ठराविक निधीची तरतूदही करण्यात आली आहे. परंतु महागाईचा भस्मासूर चा आगडोंब उसळला असल्याने सिमेंट,लोह,रेती व मजुरांच्या रक्कमेत अवाढव्य वाढ झाल्यामुळे घरकुल योजनेतील घर बांधण्या करीता लाभार्थ्याला तारेवरील कसरत करावी लागत आहे नव्हे कठीण झाले आहे. शासनाने या गंभीर बाबीची दाखल घेऊन घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना वाढीव निधी उपलब्ध करुन देण्यासाठी त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय रिपबलिकन पक्षाचे चंद्रपूर जिल्हा सरचिटणीस जयदेव हुमणे यांचे सह असंख्य कार्यकर्त्यानी केली आहे. त्यामध्ये सवर्श्री सदाशिव उंदिरवाडे , रीपाई कार्यकर्ते मारखंडी मेश्राम,मारोतराव बोरकर, पवन मेश्राम,अशोक चौधरी,विजय रामटेके, इत्यादी कार्यकर्त्यांनी केली आहे.
घर बांधकामसाठी एक लाख तीस हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येतो.परंतु या निधी मध्ये आता घर बांधणे कठीण झाले आहे.अश्या महागाईचा भस्मासूरत घरकुल योजनेतील लाभार्थी पार होरपडून निघाला आहे. कारण घर बांधणे साठी लागणारे सर्व साहित्य महाग झाले असून त्यांच्या किंमती वाढून गगनाला भिडल्या आहेत .
यामध्ये लोहा प्रती क्विंटल आठ ते नऊ हजार रुपये झाला असून सिमेंट बॅग चारशे रुपये पर्यंत झाली आहे.तर रेतीला सोन्या चांदीचे भाव आले असून रेती उपलब्ध होत नाही. *त्यामुळे अवैध्य रेती अवाजवी भावाने खरेदी करावी लागत आहे*.आणि यामधे महत्वाची बाब म्हणजे मागील एक दिड महिन्यात या सर्व साहित्याच्या किंमती वाढल्यामुळे शासनाने दिलेल्या निधीत घर बांधणे कठीण झाले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना वाढीव निधी अनुदान द्यावे व शहर आणि ग्रामीण असा भेद नकरता सर्वाँना समान निधी ऊपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी रिपाई चे ब्रम्हपुरी तालुका कार्यकर्ते यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.