कारंजा (लाड) : आपल्या स्वतंत्र देशामध्ये,आज गगनाला भिडलेल्या महागाईच्या काळात,श्रीमंत व्यक्ती अधिकाधिक महाश्रीमंत होत आहेत.तर गोरगरीबाचे खच्चीकरण होऊन त्या अधिकाधिक गरीब होत असून त्यांचे दोन वेळच्या जेवणाचे वांदे आहेत. त्यातच भरीत भर म्हणजे स्वार्थाने बरबटलेल्या आजच्या आधुनिक युगात वयस्क वयोवृद्धांचा अतोनात छळ होत असून,त्यांना त्यांचंवर, स्वतःच्या मुला सुनांकडून होणाऱ्या अत्याचारामुळे स्वतःच्या घरातूनच परागंदा होऊन वृद्धाश्रमााचा आसरा घेण्याची वेळ येत असल्याची वस्तुस्थिती आहे. दिवसेंदिवस समाजात दुर्धर आजारग्रस्त व्यक्तींची आणि दिव्यांगांची संख्या वाढतच असून, परिस्थितीमुळे त्यांचे हाल होत असून त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचेही वांदे होत आहेत. त्यामुळे समाजातील सुशिक्षित, सुज्ञ आणि माणूसकीची जाण ठेवणाऱ्या सेवाव्रती व्यक्तींनी, एकीकडे गोरगरीब निराधार व्यक्ती दोन वेळच्या जेवणासाठी तडफडत असल्याच्या त्यांच्या दुःखाची जाणीव ठेवून, यंदाच्या दिवाळीत हजारो लाखो रुपयाचे फटाके फोडून आपल्या कष्टाच्या पैशाची धुळधाणी करून पैशाचा अपव्यय करीत वातावरणात प्रदूषण करण्यापेक्षा त्याच पैशाने आपल्या परीसरातील गोरगरीब वयोवृद्ध निराधारांना नविन कपडे, किराणा आणि दिवाळी निमित्ताने मिष्टान्नाचे फराळ देवून त्यांचे अश्रू पुसून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवून आनंद प्राप्त करण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन स्थानिक महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी केले आहे.