कारंजा : ब्रम्हाकुमारीज हेड कॉर्टर माऊंट आबूचे चमूकडून, ब्रम्हाकुमारी विश्वविद्यालय कारंजा केन्द्रा मार्फत दि.२५ जुलै २०२५ रोजी गजानन महाराज अपंग विद्यालय कारंजा येथे दिव्यांग समानता संरक्षण सक्षमीकरण मोहीमेनुसार कार्यशाळा घेण्यात आले. या संदर्भात ब्रम्हाकुमारीज कारंजा कडून महाराष्ट्र राज्य साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांना मिळालेल्या माहिती नुसार, ब्रम्हाकुमारीज केंद्राकडून कारंजा येथील विदर्भ अपंग विकास संस्था द्वारा संचालित गजानन महाराज मतीमंद निवासी विद्यालय; माणिकराव ठाकरे मुकबधीर निवासी विद्यालय अंध निवासी विद्यालय येथे प्रत्येक विद्यालयात जाऊन ब्रम्हाकुमारीज तर्फे दिव्यांग समानता कार्यक्रमाद्वारे विवीध उपक्रम राबविले गेले. विद्यालयात जाऊन ब्रम्हा कुमारीज स्वयंसेवकांनी, जन्मजात आंधळे ,बहीरे, मुके, हातापायानी, अस्थिव्यंग,लुळे, पांगळे, मतीमंद आदी प्रकारचे शारीरिक दिव्यांग असलेले विद्यार्थी शिक्षक,कार्यालयीन कर्मचारी यांना त्यांच्यात शारिरीक उत्साह चेतना निर्माण करण्याकरीता मेडीटेशन द्वारा ईश्वरीय शक्ती कशी निर्माण होते ? या विषयावर शिक्षक विद्यार्थ्याना प्रात्यक्षीकाद्वारा ईश्वरीय ज्ञानाविषयी मार्गदर्शन करण्यात आले .यासाठी शाळेतील हॉलमधे कॅलेंडर लाऊन चित्रफीत दाखऊन तसेच विवीध शारीरिक खेळ, बुद्धीबळ यांचा वापर केल्या गेला. चित्रपट दाखऊनही त्यांच्यात उत्साह भरत नवचैतन्य आणण्याचा प्रयत्न केला गेला . याकरीता ब्रम्हाकुमारीज संस्थेतर्फे राजयोगीनी मालती दिदी यांच्या मार्गदर्शनात, मधुबन निवासी बीके सुर्यप्रकाश भाई शोमिक भाई ; कपील भाई साधना दिदि ; कारंजा येथील प्रदीप भाई वानखडे; डॉ निखील भाई; प्रविण भाई रिनादिदि; यांनी सहयोग दिला.