कारंजा (लाड) : कारंजा तालुक्याच्या ग्रामिण भागात, सोमवार दि.26 फेब्रुवारी 2024 च्या मध्यरात्री 01:00 वाजेदरम्यान आलेल्या प्रचंड वादळ,गारपिट आणि जोरदार अशा अवकाळी पावसाने प्रचंड कहर केल्याने कोठे मोठमोठी झाडे उन्मळून पडली तर मध्यरात्री लोकांची टिनपत्रे उडून गेली कोठे भिंती कोसळल्या तर कोठे स्लॅप पडलेत. ५०० ग्रॅम पर्यंत वजनाच्या लिंबू पेरू च्या आकाराच्या सततधार गारपिटीने बळीराजाच्या शेतातील गहू ,हरबरा,ऊस,उन्हाळी ज्वारी, पपई,भाजीपाला इत्यादी पिके उध्वस्त झालेली असून, शेतकरी राजावर कंगाल होण्याची वेळ आली आहे.याबाबत वाई, शेवती ,गायवळ, शेलुवाडा येथील ग्रामस्थांनी कळवीले असता वृत्तांकनाकरीता शेतकऱ्याच्या बांधावर गेलेल्या,महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा आमच्या जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांच्या सभोवती वाई येथील शेतकऱ्यानी गराडा करीत आपबिती सांगितली.यावेळी अक्षरशः हातातोंडाशी आलेला घास अवकाळी वादळी प्रकोपाने हिरावून नेऊन,प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यावर ओक्साबोक्सी रडण्याची वेळ आल्याने त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. वाई येथील महादेव भानुदास गावंडे वाई यांनी त्यांची दोन एक्कर उन्हाळी ज्वारी, एक एक्कर ऊस, एक एक्कर गहू,तिन एक्कर हरभरा नेस्तनाबूत झाल्याचे प्रत्यक्षदर्शी दाखवीले.तर नागपूर -औरंगाबाद महामार्गावरील गोलू लाहे यांच्या हॉटेलवरील पत्रे उडून गेल्याने हॉटेल मध्ये असलेल्या प्रवासी हार्वेस्टर चालक, ट्रकचालक यांनाही पावसाचा फटका बसला. त्यामुळे शासनाने पंचनामे करून तात्काळ सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी बळीराजा कडून होत आहे. यासंदर्भात आम्ही महसूल विभागाकडे चौकशी केली असता कारंजा तहसिल कार्यालयाचे कार्यतत्पर नायब तहसिलदार (महसूल) विनोद हरणे,तालुका कृषी अधिकारी तथा मंडल अधिकारी,तलाठी पाहणी करून मांडवा गावाकडे गेल्याची माहिती मिळाली. आमच्या माहिती प्रमाणे जिल्ह्यातील कारंजा मानोरा वाशिम मंगरूळपिर तालुक्यात अवकाळी वादळी पावसाने जनजीवन उध्वस्त झाले आहे. असे वृत्त आमचे प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळवीले.