ठाणेगाव :- येथील बस टॉप वरील एन.के. चीचपाले ले-आऊट वर ठाणेगाव प्रीमियर लीग तर्फे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा "ठाणेगाव चषक" चे १४ जानेवारी रविवार पासुन आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेचे प्रथम पारितोषिक ५०००१ रुपये, द्वितीय ३०००१ तर तृतीय २०००१ असे आहे. सोबतच ऊत्कृष्ट खेळाडुसाठी मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी, मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॉलर, बेस्ट फलंदाज,बेस्ट फिल्डर असे विवीध पारितोषिक देण्यात येणार असून खेळाडूंनी मोठ्या संख्येनी स्पर्धेत प्रवेश करून सहभागी होण्याचे आव्हान आयोजकांनी केले आहे.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी खासदार अशोक नेते,आमदार कृष्णा गजबे, किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्थेचे भाग्यवान खोब्रागडे,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे,भाजपचे गडचिरोली - चीमुर लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, भाजपा जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, नगराध्यक्ष पवन नारनवरे, माजी जि. प. सदस्य संपत आळे, भाग्यवान टेकाम, गंगाधर कुकडकर,भाजपा तालुकाध्यक्ष पंकज खरवडे,नंदुभाऊ नाकतोडे,साळवे मॅडम मुख्याध्यापिका लीसिट हायस्कूल,सभापती भारत बावनथडे, विलास पारधी, माजी प. स. सभापति निता ढोरे उपस्थित राहणार आहेत.