वाशिम : जिल्हयातील लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविण्याकरिता कन्यारत्नाचे स्वागत करण्याकरीता,स्त्री भृणहत्या रोखण्याकरीता व गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र कायद्याची अमंलबजावणी होणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने सरनाईक समाजकार्य
महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकवृंदांनी २८ ऑगस्ट रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथे बेटी बचाओ बेटी पढाओची जनजागृती केली.
या कार्यक्रमामध्ये समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जनजागृती करण्यासाठी स्त्री जन्माचे स्वागत
करा ही शपथ घेऊन रुग्णालयामध्ये आलेल्या रुग्णांनासुध्दा मुलीच्या जन्माचे व मुलींच्या शिक्षणाचे महत्व पटवुन
दिले. तसेच कोणीही स्त्रीभृण हत्या करीत असल्यास टोल फ्री क्रमांक १८०० २३३ ४४७५ व १०४ तसेच ८४५९८१४०६० या क्रमांकावर माहिती द्यावी.
प्रसुतीपूर्व निदान तंत्राचा वापर करून गर्भलिंग निदान व गर्भपात करणे हे शिक्षेस पात्र आहे. बेकायदेशीर गर्भलिंग निदानाची व गर्भपाताची माहिती देण्या-यास १ लक्ष रुपये बक्षिस देण्यात येणार आहे .गर्भलिंग निदान व गर्भपात करणा-यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.असे जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अनिल कावरखे सांगितले.
कार्यक्रमास समाजकार्य महाविद्यालयातील प्रा. डॉ. प्रसेनजित चिखलीकर, प्रा. डॉ. रविंद्र पवार,विधी समुपदेशक ॲड. राधा नरवलीया व कर्मचारी उपस्थित होते.