ब्रम्हपुरी(दि.7नोव्हेंबर):- उपविभाग ब्रम्हपुरी अंतर्गत पोलीस ठाणे तळोधी वा मधील मौजा नदिड गोपाळ टोली गावात दि. 24.05.2020 रोजी नदिड येथील आरोपी नामे मनोज विठोबा मेश्राम वय 39 रा नांदेड यानी गावातील एका महिलेसोबत अनैतीकसंबध ठेवून तिचे चारित्र्यावर संशय घेवून तिला पैशाचे कारणावरून भांडण केले व तिचा रागाचे भरात दोरीने गळा आवळून ठार केले अशा तक्रारीवरून पोलीस ठाणे तळोधी वा येथे अप.क्र. 124/2020 कलम 302,506 भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. सदर प्रकरणाचा तपास श्री. मिलींद देवराम शिंदे उप विभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी यांनी करून आरोपीविरूध्द पुरावा गोळा केला व न्यायालयात दोषारापपत्र दाखल केले.
सदर प्रकरणात दिनांक 04.11.2022 रोजी मा. कोर्ट विद्यमान श्री. भालचंद्र सा. सत्र न्यायाधीश कोर्ट चंद्रपूर यांनी साक्ष पुरावे तपासुन आरोपीविरूध्द गुन्हा सिध्द होत असल्याने आरोपी मनोज विठोबा मेश्राम रा नदिड याला कलम 302 भादंवि मध्ये आजन्म कारावासाची शिक्षा तसेच कलम 506 भादवि मध्ये 3 महिणे अधिक कारावासाची शिक्षा ठोठाविली आहे. गुन्हे शाबीत करणेकरीता परिश्रम सरकार तर्फे सरकारी वकील श्री. संदिप नागापूरे चंद्रपूर तपास मदत म्हणुन पोउपनि बाजीराव झाडे व पैरवी अधिकारी नापोशि/ विजय वाकडे पोस्टे तळोधी वा यांनी काम बघितले आहे.