वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : जिल्हयातील प्रवासी वाहन चालक व जड वाहन चालकांसाठी रस्ता सुरक्षा कार्यक्रमांतर्गत रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने मोफत नेत्र तपासणी शिबीर व नंबरचे चष्मे वाटप करण्यासाठी 29 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,वाशिम येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवासी आणि मालवाहतूक करणाऱ्या सर्व वाहन चालकांनी नेत्र तपासणी शिबीराचा लाभ घ्यावा. लाभ घेण्यासाठी वाहन चालकांनी स्वत:चे आधारकार्ड व ड्रायव्हिंग लायसन्स जवळ ठेवणे आवश्यक आहे. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी कळविले आहे.