ब्रम्हपुरी :- भारत वर्षात ई.स. 16 व्या शतकात वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, या अमूल्य शब्दाची रचना त्या काळात जगतगुरू संत तुकाराम महाराज यांनी केली व वारकरी संप्रदायाच्या सहायाने जगभरात सर्वत्र प्रसारीत केली. वृक्ष किती महत्वकांक्षी आहेत, हे मागील कोरोना काळात पष्ट झाले. देशात कोरोना महामारी काळात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे लक्षाहून अधिक लोकांनी देह-प्राण सोडले. परीणाम स्वरूप अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले. कित्येक महिला विधवा झाल्या, पुरुषांना चुली फुकाव्या लागल्या, तर काही लेकरं अनाथ झाले.
घराचा पुरुष नसल्याने त्या कुटुंबाचे सर्वत्र ओझ त्या कुटुंबातील महिलेवर येतं असते. तर महिला नसल्याने पुरुषाला घरचे काम करावे लागते. मग त्या अनाथांच काय..? ज्यांचे संगोपन करणारे त्यांना सोडुन गेले, त्यांना कोणाचा आसरा मिळणारं...? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.
निसर्ग जेव्हा कधी खेळतो, तेव्हा चांगलीच रंगत मांडतो. याचे उदाहरण म्हणुन कोरोना महामारी आहे. म्हणुन निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी आपण तत्पर असणे आवश्यक आहे. किंबहुना समाजात वृक्ष रोपण विषयी जनजागृती व कृती करणे हे मानव जातीचे प्रथम सामाजिक दाहित्व असले पाहिजे. या वृक्षामुळेच आपल्याला ऑक्सिजन मिळतो. वृक्ष तोडु नका. वर्षाला प्रत्येकाने किमान 2 वृक्ष लावुन त्याचे संगोपन करावे. हि सुद्धा जनजागृती समाजात पेरली पाहिजे.
ने. हि. महाविद्यालयातील राष्ट्रिय सेवा योजना अंतर्गत स्वयंसेवकांनी शेकडो वृक्ष रोपण करुन त्यांचे संगोपन करण्याची प्रतिज्ञा घेतली.
यावेळी ने. हि. महाविद्यालयाचे संस्थापक/सचिव अशोक भैया, प्राचार्य डॉ. डी. एच. गहाणे, उप-प्राचार्य डॉ.शेखोकर, रा.से.यो गोंडवाना विद्यापीठ संन्मयक तथा ने. हि. महाविद्यालयाचे रा.से.यो विभाग प्रमुख डॉ. प्रकाश वट्ठी प्रमुख मार्गदर्शक होते. तर ने. हि. महाविद्यालयाचे प्राध्यापक तथा व्याख्याते बालाजी दमकोडवार, प्रा.डॉ. राजु आदे, प्रा.डॉ. सुनील चौधरी, प्रा.डॉ. असलम शेख, प्रा.डॉ. दर्शना उराडे, प्रा. बगमारे मॅडम तथा सर्व प्राध्यापक/प्राध्यापिका, इतर कर्मचारी, शिपाई व मोठ्या संख्येने राष्ट्रिय सेवा योजनाचे विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.