कारंजा(लाड) : अखिल भारतीय श्री.गुरुदेव सेवा मंडळ श्री.क्षेत्र गुरुकुंज आश्रम द्वारा संचालित श्री.गुरुदेव सेवा मंडळ महिला व पुरुष भजनी मंडळ ग्रामजयंती चातूर मासा निमित्त श्री.गुरुदेव परिवाराचा मासिक सत्संग सोहळा भजन सत्संग प्रबोधन ग्रामगीता पठाण तसेच सर्वधर्म विशाल सामुदायिक प्रार्थनेचा कार्यक्रम दि.24/8/2025 दुपारी 1 ते 7.30 श्री संत गजानन महाराज मंदिर ममता नगर बायपास कारंजा (लाड) येथे सौ.अर्चनाताई कदम योग शिक्षिका, श्री.प्रल्हादरावजी पानझाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला. ह्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ.माधुरीताई पापडे ह्या होत्या. श्री.गुरुदेव सेवा मासिक सत्संग सोहळा तसेच भजनाचे कार्यक्रम भजनी मंडळ कारंजा (लाड) येथून श्री.गुरुदेव ओम महिला भजनी मंडळ प्रियदर्शनी कॉलनी बायपास कारंजा (लाड) तसेच श्री.गुरुदेव महिला भजनी मंडळाचा हा कौतुकास्पद उपक्रम तसेच कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक ग्रामगीता एक राष्ट्र वैभव या पुस्तकाचे लेखक व्याख्याते महेंद्रजी सावके प्रचारक अखिल भारतीय श्री.गुरुदेव सेवा मंडळ श्री.क्षेत्र गुरुकुंज आश्रम यांनी राष्ट्राप्रति आपली भूमिका काय ? तसेच महिलो उन्नती या विषयावर त्यांनी आपल्या मधूर वाणीतून योग्य मार्गदर्शन केले. विशाल सामुदायिक प्रार्थना व चिंतन सायंकाळी 7:00 वाजता करण्यात आली.यावेळी विनोद भाऊ जाधव अ.भा.श्री.गुरुदेव सेवा मंडळ वाशिम जिल्हा प्रचारक यांनी सर्वधर्म सामुदायिक प्रार्थनेच्या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले.तसेच वाशिम जिल्हा महिला सेवा अधिकारी सौ.ज्योतीताई उगले संजूभाऊ ताथोड मुकुंद पाटील प्रकाश भाऊ ढेरे अनिल ढेरे प्रशांत दशमुखे नामदेवराव मोखाडे भास्कर पाटील ठाकरे प्राध्यापक जगन्नाथ शिंदे तसेच पंजाबरावजी बाकल यांनी श्री. गुरुदेव सेवा मंडळ तसेच श्री. गुरुदेव महिला भजनी मंडळाचे कार्य काय या विषयावर मार्गदर्शन केले.या सर्वधर्म सामुदायिक प्रार्थनेच्या कार्यक्रमां मध्ये कारंजा (लाड) शहरातील सर्व महिला भजनी मंडळांनी आपला सहभाग नोंदविला होता.सर्वधर्म सामुदायिक प्रार्थने नंतर राष्ट्रवंदना घेऊन समारोप करण्यात आला.कार्यक्रम यशस्वी करण्या करिता श्री. रामबकस डेंडुळे तालुका भजन प्रमुख श्री.विजय खंडार अ.भा.श्री.गुरुदेव सेवा मंडळ प्रसिद्धी प्रमुख बाळू पाटील दुर्गे कैलास पाटील अंधारे विजय पाटील धुरट श्री.गोपाल काकड सौ.हर्षाताई अंधारे सौ.छायाताई तुरक सौ.ललिताताई उडाखे सौ. आशाताई व्यवहारे सौ.आशाताई भिवरकर सौ.मेघाताई गुल्हाने सौ.ज्योतीताई तिडके इत्यादींनी कठोर परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनीलभाऊ दशमुखे जिल्हा सेवाधिकारी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश पाटील गांजरे तालुका सेवाधिकार सौ.सीमाताई सातपुते तालुका भजन प्रमुख तर आभार प्रदर्शन सौ.मनीषाताई वानखडे तसेच प्रकाशक समन्वय समिती यांनी केले.असे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांचेकडे श्री.गुरुदेव मंडळाचे प्रसिद्धी प्रमुख विजय खंडार यांनी कळविले.