अकोला: स्वर्गीय श्रीधररावजी देशमुख उपाख्य मालक यांच्या १०१ व्या जयंती निमित्त निंबा ता. बाळापूर जि. अकोला परिसरातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व रक्त तपासणीचे शिबिर दिनांक २३ फेब्रुवारी २०२४ रोजी संपन्न झाले. स्वर्गीय श्रीधररावजी देशमुख उपाख्य मालक प्रतिष्ठान, निंबा द्वारा आयोजित या शिबिराचा जवळपास ४०० गरजू पुरुष व महिलांनी सहभाग नोंदविला. श्री मारोती संस्थान येथे संपन्नझालेल्या या शिबिराचे उद्घाटन हे जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला डॉ. तरंगतुषार वारे तसेच प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श सरपंच, खुर्सापार, काटोल, नागपूरचे प्रा. सुधीर अण्णाजी गोतमारे, श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगाव चे संचालक मंडळ सदस्य राजेंद्र विश्वनाथ शेगोकार, विश्व मांगल्य सभेच्या विदर्भ प्रांत यात्रा संयोजिका सौ. अपर्णाताई शिरीष धोत्रे यांचा समावेश होता.

श्री शिवाजी विद्यालय, निंबा येथे नियोजित दुपारच्या सत्रातील कार्यक्रमात सफेक्स इंडिया प्रा. ली. तर्फे भेट दिलेल्या एक हजार विद्यार्थ्यांसाठी दोन टनचे आरओ वॉटर प्युरिफायरचे लोकार्पण हेमंतभाऊ काळमेघ यांच्या हस्ते करण्यात आले तसेच संत गाडेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावतीचे सामाजिक कार्य पुरस्कार २०१९ व पर्यावरण पुरस्कार २०२३ या दोन्हींचे प्राप्तकर्ते प्रा. गजानन भारसाकळे यांचा गौरव आ. धिरजभाऊ लिंगाडे यांच्या हस्ते प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.
आ. धिरजभाऊ लिंगाडे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे ॲड. गजाननराव पुंडकर, हेमंतभाऊ काळमेघ, सुरेशदादा खोटरे, संस्थेचे आजीव सभासद रामेश्वर वाकळे, बालगंगाधर वैराळे, रमेशराव सातारकर, दादारावजी पाथ्रीकर, पुरुषोत्तमजी दहे, माधवराव खोटरे तसेच प्राचार्य पुरुषोत्तम वायाळ, प्रा. नरेशचंद्र पाटील, सफेक्स इंडिया प्रा. ली. चे महाराष्ट्र प्रमुख पवन घोगरे, स्वाती सीड्सचे संचालक श्री. सुभाषजी सावजी, प्रमोदजी देशमुख, अर्चनाताई देशमुख, ज्योतिताई सोनोने आदींची उपस्थिती होती.
मोफत आरोग्य शिबिरासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय सदैव तत्पर – डॉ. वारे
जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय सदैव तत्पर राहील, अशी ग्वाही अकोला येथील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी दिले.
महाराष्ट्रतिल सामाजिक उपक्रमात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी सफेक्स इंडिया प्रा. ली. वचनबद्ध – पवन घोगरे
समाजाला सशक्त बनवणाऱ्या शाश्वत प्रयत्नांमुळेच खरा बदल साध्य होऊ शकतो. निंबा सारख्या खरपंपट्ट्यातील गावच्या शाळेत एक हजार विद्यार्थी आता गोडे पानी पितील याचा आनंद आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) फंड मधून अंदाजित दीड लक्ष रुपयांचे दोन टनचे आरओ वॉटर प्युरिफायरचे लोकार्पण सोहळ्यादरम्यान कंपनीचे महाराष्ट्र प्रमुख पवन घोगरे यांनी विश्वास व्यक्त केला.
आपल्या प्रतिक्रिया द्या....