कारंजा (लाड) : जैन धर्मियांचे चोविसावे तीर्थंकर व साऱ्या विश्वाला अहिंसेचा संदेश देणाऱ्या भगवान महावीर ह्यांची जयंती दरवर्षी प्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरी करण्याच्या दृष्टीने सन 2023 वर्षांकरिता, सालाबादप्रमाणे यंदाही नव्याने महोत्सव समितीचे गठन करण्याकरिता स्थानिक महावीर चौकस्थित दिगंबर जैन मंदिरामध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी भगवान महावीर जयंती 3 एप्रिल रोजी साजरी करण्यात येत आहे.
ह्या सभेत सर्वानुमते भगवान महावीर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून राजेंद्र खंडारे व सचिव नितीन बुरसे व कोषाध्यक्ष म्हणून निरंजन वैद्य ह्यांची निवड करण्यात आली तर समितीचे सदस्य म्हणून अँड संदेश जैन जिंतुरकर,सतिश भेलांडे,प्रसन्ना आग्रेकर,प्रज्वल गुलालकरी,भारत हरसुले,धनंजय राऊळ,दिलीप उन्होने,अविन नांदगावकर,स्वप्नील गुलालकरी , सचिन फुरसुले,नितीन चढार,निनाद बनौरे,नविन डांगुर,अविनाश फुलंबरकर , अमोल बांडे,सुदर्शन दर्यापुरकर तर महिला प्रतिनिधी म्हणून चित्राताई मिश्रीकोटकर , सुलभाताई फुरसुले,रुपालीताई गंधक व श्रध्दाताई पंकज जैन आदींचा समावेश करण्यात आला आहे.
ह्यावर्षी भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याकरिता भ. महावीर महोत्सव समितीचे सर्व कार्यकर्त प्रयत्न करीत आहे. असे वृत्त अँड संदेश जिंतुरकर यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना कळवीले आहे .