अकोला:-स्वच्छता आणि आरोग्य यांचा दृढ संबंध आहे. महिला संपूर्ण कुटुंबाचा आधार असते. त्यामुळे निरामय आरोग्यासाठी घ्यावयाच्या दक्षतेबाबत महिलाभगिनींमध्ये अधिकाधिक जनजागृती करावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे सांगितले. जिल्हा प्रशासन व मासिक पाळी स्वच्छता दिवसानिमित्त रजोत्सव कार्यक्रम नियोजन भवनात झाला, त्यावेळी ते बोलत होते. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, जुईली अजित कुंभार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, महिला बालविकास उपमुख्य कार्य अधिकारी राजश्री कोलखेडे, अनिता तेलंग, अमित रायबोले, शिक्षणाधिकारी सुचेता पाटकर, रतनसिंग पवार, पोलीस उपअधीक्षक सतीश कुलकर्णी, नितीन खंडेलवाल, प्रभा खंडेलवाल आदी उपस्थित होते.