वाशिम : जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ अनुषंगाने १६ मार्चपासून आदर्श
आचारसंहिता लागु झाली असून निवडणुकीची अधिसूचना जारी झाली आहे व प्रत्यक्ष निवडणुक प्रचाराला सुरुवात होणार आहे.
निवडणुक प्रचारादरम्यान मतदारांवर प्रभाव पाडण्याकरीता राजकिय पक्ष व त्यांचे उमेदवार हे वेगवेगळे मार्ग अवलंबितात. तसेच निवडणुक प्रचारादरम्यान गर्दी जमविणे करीता किंवा मतदारांवर प्रभाव टाकण्याचे उद्देशाने प्रचाराकरीता आयोजीत मिरवणुक, प्रचार सभा, कॉर्नर सभा दरम्यान किंवा प्रचाराकरीता वापरण्यात येणा-या वाहनांवर लोखंडी तलवार, भाले, कोयते, विळं, त्रिशुल, कटयार असे घातक व मारक शस्त्र लाऊन शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वाशिम जिल्ह्यात मागील सन उत्सवाचे काळात विनापरवाना मिरवणुकीतील विसर्जन वाहनावर अवैध शस्त्राचे प्रदर्शन करण्याचा पुर्व इतिहास लक्षात घेता लोकसभा निवडणुक - २०२४ आचार संहिता काळात दि.५ एप्रिल रोजी जुमअतुल विदा रमजानचा शेवटचा शुक्रवार, दि.११ एप्रिल रोजी रमजान ईद, दि.१४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, दि.१७ एप्रिल रोजी श्री रामनवमी असे सण-उत्सव येणार असुन दि. २६ एप्रिल रोजी जिल्हयात मतदान
होणार आहे.
मागील काळात दाखल गुन्हयांचा पुर्व इतिहास लक्षात घेता आगामी निवडणुक काळात प्रचारा दरम्यान
शक्ती प्रदर्शनाकरीता वाहनांवर अवैध शस्त्र लावुन प्रदर्शन करुन निवडणुकीवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करण्याची
शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रचारा दरम्यान वाहनावर शक्ती प्रदर्शन करण्याचे उद्देशाने लावण्यात येणाऱ्या
तलवार, त्रिशुल, भाला, कोयता, विळा, दांडपट्टा, कटयार इत्यादी धारदार घातक शस्त्रांवर बंदी घालण्यात येत आहे. २६ एप्रिलपर्यंत
संपुर्ण वाशिम जिल्हा क्षेत्रात कलम १४४ (अ) फौ. प्र. सं. १९७३ अन्वये प्रतिबंधात्मक
आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी लागू केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....