वाशिम ( जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे ): गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह,नालंदा नगर,वाशिम येथे सन 2023-24 या शैक्षणीक सत्राकरीता रिक्त असलेल्या जागी जातीनिहाय असलेल्या आरक्षणाने गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देण्यासाठी प्रवेश अर्ज वाटप सुरू आहे.
प्रवेशासाठी असलेल्या अटी व पात्रता पुढीलप्रमाणे आहे. विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहीवाशी असावा,विद्यार्थी किमान 75 टक्के गुण मिळवून जुन 2022 मध्येच इयता 10 वी उत्तीर्ण असावा, एकूण मान्य संख्या 100 त्यापैकी अनुसूचित जातीसाठी 80 टक्के,इतर मागासवर्ग आणि विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी प्रत्येकी 5 टक्के,अनुसूचित जमातीसाठी 3 टक्के, विशेष मागासवर्गसाठी 2 टक्के,अनाथ 3 टक्के आणि अपंग 2 टक्के जागा उपलब्ध आहे.विद्यार्थी हा वाशीम शहरातील महाविद्यालयात इयता 11 वी किंवा पॉलीटेक्निक व आयटीआयच्या प्रथम वर्षात प्रवेशीत असावा. (आयटीआय 2 वर्षांचा अभ्यासक्रम आवश्यक), विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी 2 लाख रुपयापर्यंत आणि इतर मागासवर्ग, विषेश मागासवर्ग आणि विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी 1 लाख रुपयाच्या आत असावे.अर्जासोबत शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायांकीत प्रत, इयता 10 वीच्या गुणपत्रीकेची छायांकीत प्रत, उत्त्पन्नाचा दाखला मुळप्रत,जातीच्या दाखल्याची छायांकीत प्रत,रहीवाशी दाखला,महाविद्यालयात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईडची मुळ प्रत जोडणे आवश्यक आहे.
प्रवेशीत विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयी-सुविधा - शासकीय नियमानुसार विनामुल्य सकाळी एकवेळ नाश्ता व सकाळ व संध्याकाळ दोनवेळचे जेवण. विनामुल्य निवास व्यवस्था एका खोलीमध्ये फक्त 4 विद्यार्थी, एकूण 25 खोल्या आहे. पलंग व अंथरुण पांघरुणासह विनामुल्य शैक्षणिक साहित्य, प्रत्येक खोलीमध्ये 4 पंखे, शौचालय व गरम पाण्याच्या सुविधेसह स्नानगृह,दरमहा 600 रुपये निर्वाह भत्ता,गणवेशासाठी 2000 रुपये, विद्यार्थ्यांसाठी मनोरंजन कक्ष, अभ्यासीका, ई-लायब्ररी,विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसी टीव्ही कॅमेराद्वारे नियंत्रण, विद्यार्थ्यांना पिण्यासाठी शुध्द व थंड पाण्याची व्यवस्था, विद्यार्थ्यांसाठी अद्यावत व्यायामशाळा उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी प्रवेश अर्जाचे वाटप सुरू आहे. अधिक माहितीसाठी गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, नालंदा नगर, नवीन इमारत येथील कार्यालयात सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत संपर्क साधावा. असे मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहाचे गृहपाल एस.एस. इंगोले यांनी कळविले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....